Writ petition filed in high court for demanding File case on Muthoot Finance
Writ petition filed in high court for demanding File case on Muthoot Finance  
पुणे

मुथुट फायनान्ससह इतरांवर गुन्हा दाखल करा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''कर्जाचा हप्ता थकल्याने ग्राहकास वसुली पथकातील महिलांकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुथुट फायनान्स कंपनीसह 17 जणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठात किरकोळ कारणावरुन मारहाण; किचेनच्या छोट्या चाकूने केेले वार 

प्रतिदावादींवर गुन्हा दाखल करावा, तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण पुरवावे, मानसिक त्रासापोटी पाच लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रभाकर कुतवळ यांनी मुथुट फायनान्स कंपनीतील संबंधित महिलांविरुद्ध दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पिंपरीत किरकोळ कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

कुतवळ यांनी वाकडेवाडी येथील मुथुट फायनान्स कंपनीतून दोन वर्षांपूर्वी 14 लाख रुपये कर्ज घेतले आहे. आतापर्यंत ते नियमितपणे कर्जाचे हप्ते वेळेवर भरत होते. मात्र त्यांचा सप्टेंबर महिन्याचा त्यांचा हप्ता थकला होता. त्यामुळे फायनान्स कंपनीतून फोन करून तेथील महिलांनी वाईट शिवीगाळ केली व तुझ्याकडे बघूनच घेतो, अशी धमकी त्यांना दिली. हप्ता का भरला नाही अशी महिलेने विचारणा केल्यावर माझा चेक मिळाला नाही, सोमवारपर्यंत चेक मिळाला की हप्ता भरतो, असे कुतवळ म्हणाले. त्यावर कंपनीतून बोलणाऱ्या महिलेने अर्वाच्य भाषेत बोलायला सुरवात केली. 

बोरघाट जानेवारीपर्यंत सुरक्षित; दुरुस्ती वेगात 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT