Writer support for visually impaired students for SSC EXam 
पुणे

SSC Exam : दृष्टिहिन विदयार्थ्यांना लेखनिकांचा आधार

सकाळवृत्तसेवा

हडपसर : दहावीच्या परीक्षेला बसलेल्या दृष्टिहिन विदयार्थ्यांना गेनबा सोपानराव मोझे शाळा गेल्या12 वर्षांपासून लेखनिक पुरवते. यंदाच्या परीक्षेत देखील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विदयालयातील 15 दृष्टिहिन विदयार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून मोझे शाळेतील विदयार्थी जबाबदारी सांभाळत आहेत. या उपक्रमामुळे दृष्टिहिन विदयार्थ्यांची सोय होते. तसेच दृष्टिहन व सामान्य मुले यांच्यात मैत्री घट्ट होते. त्याचबरोबर मोझे शाळेतील विदयार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व आपण समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना निर्माण होण्यास मदत होते.

दृष्टिहिन विदयार्थी संकेत शर्मा म्हणाला, ''दहावीच्या परीक्षेच्यावेळी विदयार्थ्यांना लेखनिक शोधण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. एकीकडे अभ्यास करायचा की, दुसरीकडे लेखनिक शोधायचा याची घालमेल सुरू असते . परीक्षेचा कालावधी असल्यामुळे विदयार्थी व पालक लेखनिक म्हणून जबाबदारी घेण्यास नकार देतात. मात्र मोझे शाळा गेली 11 वर्षे आमच्या शाळेतील विदयार्थ्यांना लेखनिक पुरवतात. त्यामुळे आम्हाला लेखनिकाची शोधाशोध करावी लागत नाही.''

अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा

मोझे शाळेचे प्राचार्य संजय सोमवंशी महणाले, ''आमची शाळा विदयार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबवते. त्याचा एक भाग म्हणून गेल्या 11 वर्षापासून दृष्टिहन विदयार्थ्यांना लेखनिक पुरविण्याचा वसा संस्थेने घेतला आहे. यासाठी मोझे शाळेचे अध्यक्ष व माजी आमदार रामभाउ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्र्वर मोझे, अलकाताई पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहाकार्य आम्हाला मिळते. आमच्या शाळेतील विदयार्थी व पालक यांच्या सहकार्यातूनच हा उपक्रम सुरू आहे.''

लोकेशनद्वारे सायबर पोलिसांनी केली दिल्लीतून अटक

लेखनिक  म्हणाला, ''आमच्या शाळेन दहावीच्या दृष्टिहिन विदयार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून काम करण्याची संधी दिल्याने आम्हाला खूप आनंद झाला. दृष्टिहिन विदयार्थ्यांना जन्मतःच अनेक समस्या असतात. मात्र त्यावर मात करीत मोठया आनंदाने जीवन जगतात. मात्र आम्ही छोटया छोटया गष्टींसाठी नाराज होतो. ही गोष्ट आम्हाला या माध्यमातून शिकायला मिळाली.''

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT