Police  sakal
पुणे

पोलिस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी पाच ऑक्‍टोबरला लेखी परीक्षा

परिक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी कडक नियमावली, गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे पोलिस आयुक्तालयातील 2019 ची पोलिस शिपाई पदासाठीची लेखी परिक्षा 5 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. पोलिस भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच पहिल्यांदाच शारिरीक चाचणीपुर्वी लेखी परीक्षा होत आहे. त्यानुसार, परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी पुणे पोलिसांनी कडक नियमावली केली आहे. तसेच कुठल्याही प्रकारे गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्तही ठेवला आहे

राज्यात दरवेळी होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेपेक्षा यंदापासूनच्या भरती प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, आगोदर लेखी परीक्षा व त्यानंतर शारिरीक चाचणी होणार होणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पहिल्यांदाच प्रत्येक घटकाला खासगी यंत्रणेमार्फत लेखी परिक्षा घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुणे पोलिस आयुक्तालयाची लेखी परिक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. पुणे पोलिसांकडून परीक्षेची सर्व तयारी करण्यात आली आहे. परीक्षा चांगल्या वातावरणात पार पडावी, यादृष्टीने उमेदवारांना नियमांचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ.जालिंदर सुपेकर यांनी दिली. परिक्षेत गैरप्रकार घडू नये, म्हणून सीसीटीव्ही, बायोमेट्रीक सुविधा, व्हिडीओ चित्रीकरणही केले जाणार आहे.

वर्ष 2019 पोलिस भरतीची वैशिष्ट्ये

  1. पोलिस शिपाई पदासाठीच्या एकूण जागा - 214

  2. आत्तापर्यंत पोलिसांकडे आलले एकूण अर्ज - 39 हजार 323 अर्ज

  3. लेखी परीक्षेचा वार - रविवार, 5 ऑक्‍टोबर (वेळ सकाळी 11 ते 12.30)

  4. एकूण परिक्षा केंद्र - 79

  5. परिक्षा हॉलची संख्या - 1 हजार 591

  6. परीक्षेसाठी ठेवण्यात आलेला पोलिस बंदोबस्त - 2 हजार 744

उमेदवारांसाठी अशी आहे नियमावली

  1. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर वेळेत प्रवेश केंद्रावर दाखल व्हावे

  2. पोषाखामध्ये हाफ बाह्यांचा शर्ट, टिशर्ट, टॉप परिधान करावे.

  3. इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल, स्मार्ट वॉच, ब्लुटूथ सारखी उपकरणे केंद्रा बाहेर ठेवावीत

  4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी स्वयंघोषणापत्र, वचनपत्र स्वहस्ताक्षरात लिहून द्यावे

  5. प्रवेशपत्राबरोबरच शासनाने सांगितप्रमाणे वैध ओळखपत्राचा पुरावा (आधार, पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट) सोबत ठेवावे.

  6. परिक्षा संपल्यानंतर प्रवेशपत्र पर्यवेक्षकांकडे परत करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

Nagpur Exam Management: नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी डॉ. अनुप पळसोकर; विस्कळीत परीक्षा व्यवस्थेला रुळावर आणण्याचे मोठे आव्हान

सोलापुरात ओळखीच्या चौघांनी सराफ व्यापाऱ्याला लुबाडले! ८४.५२ लाख रुपये आणि सव्वाकिलो दागिने लंपास; मनीलँडिंग अन्‌ गहाण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये चौघांनी केला अपहार

SCROLL FOR NEXT