murder news  sakal
पुणे

झेरॉक्स दुरुस्ती व्यावसायिकाचा नऱ्हे येथे खून; उपचारादरम्यान मृत्यू

खुनाच्या घटनांमध्ये खून करण्याचे अनेकाधिक कारणे असतात. यामध्ये प्रामुख्याने पूर्ववैमनस्य, किरकोळ वाद, प्रेम प्रकरण, प्रॉपर्टीज अथवा आर्थिक कारण सुद्धा असू शकतो.

विठ्ठल तांबे

खुनाच्या घटनांमध्ये खून करण्याचे अनेकाधिक कारणे असतात. यामध्ये प्रामुख्याने पूर्ववैमनस्य, किरकोळ वाद, प्रेम प्रकरण, प्रॉपर्टीज अथवा आर्थिक कारण सुद्धा असू शकतो.

धायरी - खुनाच्या घटनांमध्ये खून करण्याचे अनेकाधिक कारणे असतात. यामध्ये प्रामुख्याने पूर्ववैमनस्य, किरकोळ वाद, प्रेम प्रकरण, प्रॉपर्टीज अथवा आर्थिक कारण सुद्धा असू शकतो. यापैकी सध्या अशाच एका कारणांवरून तरी सहा ते सात जणांच्या टोळक्यांनी नऱ्हे येथे एका चौप्पन वर्षीय झेरॉक्स दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकाचा हत्याराने वार केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत गंभीर जखमी होऊन त्याचा आज शनिवारी (ता. 1 ऑक्टो.) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

वरील नमूद कारणांपैकी एका आर्थिक करणातूनच त्याचा खून झाला असल्याचा अंदाज सिंहगड रोड पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर आता सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व आरोपीना व्यावसायिकाचा खून करणं चांगलाच महागात पडणार आहे. तसे तपासाचे चक्रे व हालचाली सिंहगड रोड पोलिसांनी सुरु केले आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार सुनिल राधाकिसन नलवडे (वय ५४, रा. भैरोबा नाला, फातिमानगर) असे उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या झेरॉक्स दुरुस्ती किरकोळ व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सुदाम राधाकिसन नलवडे (वय ५७, रा. लोणी काळभोर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४२८/२२) दिली आहे. ही घटना नर्‍हे येथील अभिनव कॉलेज रोडवरील विश्व रेसिडेंन्सी जवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याबाबत  सिंहगढ रोड पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अभिनव कॉलेज रोडवरील विश्व रेसिडेंन्सी जवळ एका चार चाकी गाडीमधून सहा ते सात जण सुनिल नलवडे यांना घेऊन आले. या ठिकाणी धारदार शस्त्रांसह तर काहीही त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर सुमारे अडीच तासांनंतर सिंहगढ  रोड पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली़. तोपर्यंत ते घटनास्थळीच गंभीर  जखमी अवस्थेत पडून होते. लागलीच पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले़. मात्र, आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांचा तब्बल साडे सात तासानंतर मृत्यु झाला.

आर्थिक कारणातून खून.... 

सुनील नलावडे हा शांत स्वभावाचा असल्याचे त्याचा भाऊ सुदाम नलावडे यानो पोलिसात दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे. सुनील यांनी काही जणांकडून बिनव्याजी लाखाचे कर्ज घेतल्याची माहिती आहे. पूर्वी सुनील हा कॅम्प भागात झेरोक्स दुरीस्तीचे कामे करीत होता. त्यामुळे त्यांना आता सुद्धा झेरॉक्स दुरस्ती व्यावसायिक म्हणूनच बघितले जात होते. अनेकांकडून कर्ज घेऊन सुनील कर्जदात्यांना चकमा देऊन फिरत असल्याची बोलले जात आहे. या सर्व प्रकारावरून सुनील यांचा म्हणजे आर्थिक करणातूनच खून झाला असावा, असा अंदाज सिंहगड रोड  पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

खुनाच्या घटनेपासून सहा ते सात आरोपी फरार आहेत. पोलिसांनी या सर्व आरोपींवर खुनाचे विविध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भां द वी 302,143,144,145 यासह 7 विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्या फरार आरोपींच्या शोधासाठी सिंहगड पोलिसांनी हालचसली सुरु केल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास सहाय्य्क पोलीस निरीक्षक राहुल यादव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT