यशोदा कॅम्पसमध्ये एनआयपीएम स्टुडंट चॅप्टर
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन; विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार
सातारा, ता. ५ ः यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे मॅनेजमेंट फॅकल्टीतील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट सातारा सह्याद्री चॅप्टरच्या वतीने स्टुडंट चॅप्टरचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.
स्टुडंट चॅप्टरच्या उद्घाटनप्रसंगी यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे, एनआयपीएमच्या वेस्टर्न रिजनल कॉन्फरन्सचे कन्वीनर व कूपर कॉर्पोरेशनचे मुख्य मानव संसाधन अधिकारी डॉ. नितीन देशपांडे, चॅप्टरचे अध्यक्ष व विप्रो पारी लिमिटेडचे ग्लोबल हेड आयआर डॉ. उदय भोसले, चॅप्टरचे सचिव महेश खरे, यशोदा शिक्षण संस्थेचे सहसंचालक डॉ. रणजितसिंह मोहिते आणि जगन्नाथ कांबळे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. अजिंक्य सगरे यांनी एनआयपीएमसारख्या व्यावसायिक संस्थांशी संपर्क ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते व विकसित भारताच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे व्यवस्थापनातील कार्यक्रम हाती घेणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. त्याचबरोबर दहा ऑक्टोबरला एनआयपीएम सातारा सह्याद्री चॅप्टरने आयोजित केलेल्या वेस्टर्न रिजनल कॉन्फरन्सचे को-होस्ट पद स्वीकारल्याचे डॉ. सगरे यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे डॉ. देशपांडे यांनी स्टुडंट चॅप्टरच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र व उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा साधला जात आहे, असे सांगितले. स्टुडंट चॅप्टरच्या सक्रिय सहभागातून व्यवस्थापनातील विद्यार्थ्यांना एनआयपीएमचे वेबिनार, कॉन्फरन्सेस, लेक्चर्स व इतर पद्धतीचे मार्गदर्शन मिळून त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन बदलेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उदय भोसले यांनी एनआयपीएमच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्याविषयी, तसेच सातारा सह्याद्री चॅप्टरने राबविलेल्या विविध उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------
47284
सातारा ः स्टुडंट चॅप्टरच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. अजिंक्य सगरे, डॉ. उदय भोसले, उपाध्यक्ष डॉ. नितीन देशपांडे आदी.
..............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.