पुणे

सातारा : यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा यांच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक विस्ताराच्या

CD

रशियातील विद्यापीठांना
‘यशोदा’च्या सहसंचालकांची भेट

सातारा, ता. ७ ः यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या संस्थेचे सहसंचालक प्रा. डॉ. रणधीरसिंह मोहिते, प्राचार्य प्रा. डॉ. विठ्ठल चवरे आणि विभागप्रमुख प्रा. डॉ. अविनाश भागवत या प्राध्यापकांनी नुकत्याच आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमार्फत रशियातील पिरोगोव्ह युनिव्हर्सिटी आणि आरयूडीएन युनिव्हर्सिटी, रेडक्रॉस ॲकॅडमी मॉस्को, तसेच रशियातील इतर विविध संशोधन संस्था, तसेच हॉस्पिटल येथे नुकतीच भेट दिली.
या अभ्यास दौऱ्यादरम्यान प्राध्यापकांनी दोन्ही विद्यापीठांच्या विविध विभागांना, अत्याधुनिक प्रयोगशाळांना आणि संशोधन केंद्रांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक व संशोधनविषयक कार्यप्रणालीची माहिती घेतली. प्रयोगशाळांमध्ये सुरू असलेले संशोधन, आधुनिक उपकरणांचा वापर, संशोधनाधारित अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या प्रगत सुविधा आणि उद्योग व संशोधन संस्थांशी असलेले संबंध यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी या भेटीतून मिळाली.
या भेटीत दोन्ही विद्यापीठांसोबत भविष्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली आहे. या अभ्यास भेटीसाठी संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अजिंक्य सगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशोदा संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे एवढाच मर्यादित नसून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम आणि स्पर्धात्मक बनविणे हा आहे. रशियातील नामांकित विद्यापीठे आणि त्यांच्या अत्याधुनिक प्रयोगशाळांना दिलेली ही भेट आमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरली आहे. या विद्यापीठांसोबत लवकरच सामंजस्य करार करून विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे मत उपाध्यक्ष प्रा. डॉ. सगरे यांनी व्यक्त केले.

PNE26W64774
सातारा ः रशियातील पिरोगोव्ह युनिव्हर्सिटीमध्ये प्रा. डॉ. रणधीरसिंह मोहिते, प्राचार्य प्रा. डॉ. विठ्ठल चवरे आणि प्रा. डॉ. अविनाश भागवत यांनी भेट दिली.

.......................चिंचकर.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भगवंत मान यांना व्हिसा देण्यास पाकिस्तान तयार; पण भारत सरकार परवानगी देणार का?

IND vs NZ 2nd ODI Live : धो धो पाऊस सुरू झाला... भारताच्या झाल्यात ७ बाद ११३ धावा; सामना आता रद्द झाला तर जिंकणार कोण?

Sakal Lit Fest 2026: ‘सकाळ लिट फेस्ट’ १२ नोव्हेंबरपासून;बुकर विजेत्या बानू मुश्ताक यांच्या हस्ते उद्‍घाटन

''अजितदादांच्या निधनानंतर सुनील तटकरेंना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं पाहिजे होतं'', आमदार महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप

Mumbai News: सरकारला न्यायालयाचा दणका, खासगी प्रकल्पासाठी 'टाटा'च्या जमीन संपादनाचा निर्णय रद्द

SCROLL FOR NEXT