पुणे

तळेगावचा दत्तात्रय चौथीच्या शिष्यवृत्ती राज्यात प्रथम

CD

तळेगाव ढमढेरे, ता. १४ : येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी यशवर्धन दत्तात्रय थोरात याने चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २९६ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. शाळेतील एकूण १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून, यात चार विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर, तर १३ विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर यश प्राप्त केले आहे.
राज्य गुणवत्ता यादीत श्रुती राखे (८ वी), सौम्या सादिगले (१० वी) आणि प्रेम मठपती (१० वा) यांनी स्थान मिळवले. सातवीच्या परीक्षेत तनिषा चव्हाण हिने जिल्हा गुणवत्ता यादीत यश संपादन केले. जिल्हा गुणवत्ता यादीत गंधर्व ढमढेरे, सृष्टी धुमाळ, शाकरीन बागवान, देवांश जाधव, माही शिलवंत, श्रेषा शिंदे, स्पृहा भाईक, त्रिषिका सातपुते, प्रेम जाधव, शारोन पठारे, वेदांत टोंचर, तन्वी शेळके आणि रुद्र सावंत या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
या यशस्वी विद्यार्थ्यांना सीमा कुंभार, प्रेमला मोहिते, सारिका गायकवाड, जयश्री इघे, माधुरी शेजवळ व जयवंत भुजबळ यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका नूतन तोडकर व जयवंत भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. गटशिक्षणाधिकारी प्रीतम कोकणे, सरपंच रोहिणी तोडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपेश शिलवंत व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

R. Ashwin: अश्विन क्रिकेटवर बोलत होता अन् अचानक घराबाहेर पोलीस आले; फोन उचलताच समोर आलं ‘ते’ कारण...

Nag Panchami 2026: भावासाठी उपवास,जमीन न खोदणे ते चुलीचा नियम; जाणून घ्या नागपंचमीला पाळल्या जाणाऱ्या प्रथा!

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

SCROLL FOR NEXT