पुणे

यशवंत हायस्कूल, कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा: ''अटल'' जिल्हास्तरीय प्रदर्शनात प्रथम क्रमांक

CD

‘जिल्हास्तरीय अटल’मध्ये ‘यशवंत’ प्रथम

कऱ्हाड, ता. १६ ः येथील यशवंत हायस्कूलने शैक्षणिक आणि तांत्रिक क्षेत्रात घोडदौड कायम राखत दुहेरी यश संपादन केले आहे. सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय अटल प्रदर्शनात विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.

एससीईआरटी पुणे व डाएट, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे जिल्हास्तरीय अटल प्रदर्शन झाले. जिल्ह्यातील अटल टिंकरिंग लॅब असलेल्या ६४ शाळांनी यात सहभाग घेतला होता. यात यशवंत हायस्कूलच्या आठवीचा विद्यार्थी शंतनू येडगेने सादर केलेल्या ‘वूमन्स सेफ्टी स्मार्ट ॲप’ या थीम बेस्ड प्रोजेक्टला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणारे हे ॲप आकर्षणाचे केंद्र ठरले. डाएट अटल विभाग प्रमुख डॉ. एस. डी. फरांदे यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान केले. कल्पासाठी अटल लॅब प्रमुख डी. एस. शेट्टीगार, पी. पी. कुलकर्णी, एन. ए. वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.

माजी मुख्याध्यापक एस. एम. महामुलकर, मुख्याध्यापक व्ही. यू. पाटील, पर्यवेक्षिका एस. एस. मोरे, गुरुकुल प्रमुख एम. एम. घारगे, विभाग प्रमुख पी. एस. पाटील व एम. जे. काटवटे यांच्यासह शिक्षकांचे सहकार्य मिळाले. या यशाबद्दल ॲड. रवींद्र पवार, ॲड. सत्यजित पवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.


W18765
सातारा ः जिल्हास्तरीय अटल प्रदर्शनात डॉ. एस. डी. फरांदे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना शशवंत हायस्कूलचे अटल लॅब पथक.
...............................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT