यशवंतराव गडाख sakal
पुणे

यशवंतराव गडाखांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलं वर्षभराचे निवृत्तीवेतन

देणगीचा धनादेश आणि पत्र लेखक अरुण शेवते आणि दत्तात्रय अत्रे यांनी गडाख यांच्या वतीने मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे नुकतेच सुपूर्द

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे ः संसदेचे आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विश्वस्त आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी माजी आमदार म्हणून मिळत असलेल्या निवृत्ती वेतनाची वर्षभराची रक्कम सात लाख अडुसष्ट हजार रुपये महाराष्ट्र साहित्य परिषदेला देणगी म्हणून दिली आहे. या देणगीचा धनादेश आणि पत्र लेखक अरुण शेवते आणि दत्तात्रय अत्रे यांनी गडाख यांच्या वतीने मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे नुकतेच सुपूर्द केले.

"कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेला देखील त्याची झळ बसलेली आहे, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्राच्या विस्तार कार्याच्या गतीला खीळ बसलेली आहे. तेव्हा साहित्य, संस्कृतीची पंढरी असलेल्या या मातृसंस्थेला फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी माजी आमदार म्हणून मिळत असलेल्या वर्षभराच्या पेन्शनची रक्कम रु. ७,६८,०००/- (अक्षरी रुपये सात लाख अडुसष्ट हजार मात्र) देणगी स्वरूपात देत आहे." असे गडाख यांनी प्रा. मिलिंद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

प्रा. जोशी म्हणाले, ‘‘गेल्या दीड वर्षापासून परिषदेचे सभागृह, अतिथीनिवास, ग्रंथालय, ग्रंथप्रदर्शन बंद होते त्याचा मोठा आर्थिक फटका परिषदेला बसला. कार्यालय व्यवस्थापनावरचा खर्च, बँकांचे कमी झालेले व्याजदर आणि शासनाने दहा लक्ष रुपयांच्या अनुदानापैकी केवळ एक लाख रुपयेच अनुदान दिल्याने या नुकसानात भरच पडली. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते आहे. अशा काळात संवेदनशील राजकारणी आणि समाजमनस्क साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केलेली ही मदत मोलाची आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar last phone call : अजित पवारांचा अपघातापूर्वी शेवटचा फोन पुतण्याला; ८ वाजून ३७ मिनीटांनी बोललेल्या ऑडिओ क्लिप व्हायरल

Gajabhau X Account: 'गजा भाऊ' अकाउंट डिलीट होणार? देवेंद्र फडणवीसांशी संबंधित प्रकरण काय? महाराष्ट्र पोलिसांची X ला नोटीस

Praful Patel : ‘तो’ निर्णय सुनेत्रा पवारांचा; प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत केले स्पष्ट

Pankaja Munde : राजकारणात बोलताना पथ्य पाळायला हवे

Latest Marathi News Live Update : नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT