Kharbuja sakal
पुणे

Kharbuja : माळावरील खरबुजांची दिल्लीकरांना गोडी

बोरीबेल (ता. दौंड) येथील बाळकृष्ण व दीपक पाचपुते बंधूंनी खडकाळ माळरानावर निर्यातक्षम कांचन जातीच्या खरबुजांचे भरघोस उत्पादन घेतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

बोरीबेल (ता. दौंड) येथील बाळकृष्ण व दीपक पाचपुते बंधूंनी खडकाळ माळरानावर निर्यातक्षम कांचन जातीच्या खरबुजांचे भरघोस उत्पादन घेतले आहे.

यवत - बोरीबेल (ता. दौंड) येथील बाळकृष्ण व दीपक पाचपुते बंधूंनी खडकाळ माळरानावर निर्यातक्षम कांचन जातीच्या खरबुजांचे भरघोस उत्पादन घेतले आहे. स्थानिक बाजार पेठेसोबतच गेली पंधरा वर्षांपासून दिल्लीच्या बाजारपेठेत खरबुजांना चांगली मागणी आहे. बारा एकरमध्ये केलेल्या लागवडीमध्ये त्यांना चांगला नफा मिळत आहे.

बोरीबेलच्या डोंगर पायथ्याला असलेल्या खडकाळ व उंचसखल जमिनीवर बाळकृष्ण पाचपुते, त्यांच्या पत्नी अश्विनी, बंधू दीपक व त्यांच्या पत्नी रूपाली कष्टाने मोठ्या जोमाने खरबुजाची शेती फुलविली. प्रतिकूल परिस्थितीमध्ये पाचपुते कुटुंबीय दरवर्षी खरबुजाचे उत्तम दर्जाचे पीक घेतात. खरबूजास उन्हाळ्यामुळे फेब्रुवारी ते मे या दरम्यान चांगली मागणी असते. तर रमजानच्या महिन्यात साधारण एप्रिलच्या सुमारास खरबुजाला चांगली मागणी असते.

मुरमाड जमिनीत लागवड

  • खडकाळ जमिनीत दोन अडीच फुटांचे चर खोदले

  • चरात चांगली माती, कंपोस्ट खत व इतर जैविक खतांचा वापर

  • मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर

  • त्याद्वारे पाणी, स्लरी व इतर खतांचा नियोजबद्ध वापर

  • खडकाळ व दगडगोटे असलेल्या भागात वेल पसरतात

  • उंचसखलपणामुळे पिकाला पाणी देणे सोपे होते

एकरी उत्पादन - १० ते १५ टन

एकरी खर्च - ८०,००० रुपये

प्रतिकिलोचा भाव - २५ रुपये

खरबुजाच्या जाती

  • कारमेल एफ१

  • डेलानो

  • राजकुमारी स्वेतलाना एफ१

  • एफ१

  • पासपोर्ट

  • डिगारा

  • रेमंड

  • केळी खरबूज

  • अमल

  • सिंड्रेला

  • मोहॉक एफ१

  • सेरेझकिना

मार्च, एप्रिल व मे या काळात खरबुजास उन्ह्याळ्याच्या दिवसांमुळे सर्वत्र चांगली मागणी असते. तर एप्रिलच्या सुमारास मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना येतो. या काळात रोजे सुरू होतात. तेव्हा खरबुजांना मोठी मागणी असते. हे दोन हंगाम या पिकासाठी प्रयत्नपूर्वक साधावेच लागता.

- बाळकृष्ण पाचपुते, खरबूज उत्पादक

उत्तम पिकणारी कांचन ही जातीची टरबुजे मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतात. ती जास्त काळ टिकतात. त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. तसेच या जातीला चांगला उतार आहे. एकरी पंधरा ते वीस टनांचे उत्पादन मिळते. किमान पंचवीस ते तीस रुपये बाजारभाव मिळाला तरी उत्पादन खर्च वसूल होऊन चांगले उत्पन्न मिळते.

- दीपक पाचपुते, खरबूज उत्पादक

जमीन सुपिकतेमुळे फळाचा आकार, गोडी, चमक चांगली असल्याने बाजारामध्ये त्यांना विशेष मागणी आहे पर्यायाने दर सुद्धा चांगला मिळतो. दिल्ली, मुंबई, पुणे मार्केटचा अभ्यास करून खरबुजाची लागवड करतात. त्यामुळे शेतीमधील तोटा टाळण्यात पाचपुते बंधू यशस्वी झाले आहेत.

- महेश रामभाऊ रूपनवर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) दौंड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT