This year uniform distribution to all students of Zilla Parishad Schools.jpg 
पुणे

जिल्हा परिषद शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट गणवेश वाटप: यंदापासून अंमलबजावणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना सरसकट प्रत्येकी दोन गणवेशांचे वाटप करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. या निर्णयाची येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी केली जाणार आहे. याचा पुणे जिल्ह्यातील दोन लाख ३३ हजार ७२० विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले.        

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 या निर्णयामुळे सरसकट सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा परीषद ठरली आहे. दरम्यान, केंद्रीय किंवा सरकारकडून गणवेशासाठी अनुदान मिळत नसल्याने जिल्ह्यातील ७९ हजार ७५८ विद्यार्थी गणवेशाच्या लाभापासून वंचित राहत असत. या वंचित मुला-मुलींना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून (जिल्हा परिषद सेस फंड) गणवेशासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे शिवतरे यांनी सांगितले.


पुण्याच्या बातम्या वाचण्यासााठी येथे ►  क्लिक करा 
                   
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या इयत्ता आठवीपर्यंत वर्ग असलेल्या तीन हजार ७३७ शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी सर्व मुली , मागासवर्गीय आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुला-मुलींना दरवर्षी प्रत्येक दोन गणवेशासाठी सरकारकडून अनुदान प्राप्त होत असते. यानुसार प्रति विद्यार्थी सहाशे रुपये निधी उपलब्ध होत असतो. परिणामी सर्वसाधारण गट आणि इतर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थी या गणवेशापासून वंचित राहत असत. या वंचित विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद गणवेश देणार आहे. परिणामी जिल्हा परिषद शाळेतील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

Pune Voter Mapping: वडगाव शेरीत सव्वा लाख मतदारांचे मॅपिंग पूर्ण; उर्वरित मतदारांना SIR मोहिमेत लवकर सहभागी होण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT