Tortoise Sakal
पुणे

औंधमध्ये आढळलेल्या पिवळसर पांढऱ्या कासवाची आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नोंद

औंध चौकात जुलै २०१९ मध्ये आढळलेल्या गोड्या पाण्यातील दुर्मिळ असे अल्बिनो भारतीय मृदुकाय कासवावर (इंडियन फ्लेप शेल टर्टल) आता आढळले होते.

- मीनाक्षी गुरव

पुणे - औंध चौकात (Aundh) जुलै २०१९ मध्ये आढळलेल्या गोड्या पाण्यातील दुर्मिळ असे अल्बिनो भारतीय मृदुकाय कासवावर (इंडियन फ्लेप शेल टर्टल) (Indian Flapshell Turtle) आता आढळले (Found) होते. आता या कासवावरील शोधनिंबध नुकताच एका आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. (Yellowish Wwhite Tortoise Found in Aundh Recorded in International Journal)

गोड्या पाण्यातील अल्बिनो भारतीय मृदुकाय कासव देशभरात नदी आणि तलावात आढळते. हे मिश्राहारी असून पाणवनस्पती, गोगलगाई, कोळंबी आणि मासे याचे अन्न आहे. अल्बिनो कासव संपूर्ण पिवळसर पांढरे असल्यामुळे ओळखणे अवघड असते. अलाईव्ह संस्थेचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला आणि सर्पमित्र राजेंद्र कांबळे यांचा या कासवावरील शोधनिबंध ‘झु’ज्‌ प्रिंट या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत २१ जूनला प्रसिद्ध झाला आहे.

हे गोड्या पाण्यातील भारतीय मृदुकाय कासव असून हे ‘अल्बिनो’ म्हणजेच रंगहीन होणे, असे हे कासव अतिशय दुर्मिळ आहे. रंग द्रव्याच्या कमतरतेमुळे सजीवांची त्वचा पांढरी किंवा फिक्कट पिवळसर होते. याला अल्बिनिझम असे म्हणतात. ही रंगहीनता अणुवांशिकता, एखाद्या आजार, जणुकिय बदल तसेच खात असलेल्या अन्नदोषांमुळे सुद्धा येऊ शकते. वन्यजीवांच्या अनेक प्रजातीमध्ये एखाद रंगहीन जीव क्वचित सापडतो. विशेषत: पांढऱ्या रंगामुळे हे जीव त्यांच्या शत्रूच्या नजरेत त्वरित येत असल्यामुळे कमी आयुष्य जगतात. देशात संपूर्ण रंगहीन भारतीय मृदुकाय कासवाची प्रथम नोंद १९२८ मध्ये नागपूर येथे झाली होती. त्यानंतर हिम्मतनगर (गुजरात), चेन्नई (तामिळनाडू), कोळिकोड (केरळ) अशा मोजक्या ठिकाणी अशी कासवे आढळले आहेत. तब्बल ९२ वर्षानंतर महाराष्ट्रात दुसऱ्यांदा हे भारतीय मृदुकाय कासव जुलै २०१९मध्ये औंधमध्ये आढळले, अशी माहिती वाघेला यांनी दिली. या शोधनिबंधासाठी झुलोजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनिल महाबळ यांनी मार्गदर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर मोठी घटना, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक लागली आग, अग्निशमन दल घटनास्थळी

Crime News : भगवा दुपट्टा घालून मांसाहार केल्याने तरुणाला मारहाण, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात... नेमका कुठं घडला प्रकार?

Ganeshotsav 2025 : 'शंकराचा बाळ आला’ – सूर, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर संगम; गणेशोत्सवासाठी नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास दिली भेट

Online Gaming Bill: ऑनलाईन गेमिंग बिल! केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; नेमका कायदा काय? कशावर येणार बंधन?

SCROLL FOR NEXT