Wild Pig sakal
पुणे

Vishrantwadi News : येरवड्यात भर वस्तीमध्ये शिरले जंगली डुक्कर; अनेक नागरिकांना घेतला चावा

आज पहाटे येरवडा परिसरातील मदर तेरेसानगर, गाडीतळ भागामध्ये अचानक जंगली डुक्कर शिरल्याने भरवस्तीमधील नागरिक भयभीत झाले.

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी - आज पहाटे येरवडा परिसरातील मदर तेरेसानगर, गाडीतळ भागामध्ये अचानक जंगली डुक्कर शिरल्याने भरवस्तीमधील नागरिक भयभीत झाले. ते डुक्कर वस्तीत धावत असताना अनेक नागरिकांना त्याने चावा घेतला.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असता, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे व सहकाऱ्यांनी तत्काळ या जंगली डुकराला पकडण्यासाठी येरवड्यातीलच डुक्कर व्यावसायिक यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी त्यांच्या पूर्ण साहित्य वापरून, जाळी वापरून या डुकराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु तरीही ते जंगली जनावर लवकर ताब्यात येत नव्हते.

गल्लीबोळातून वस्तीवस्तीतून ते लक्ष्मीनगर परिसरामध्ये शिरले व तेथेही काही नागरिकांना चावा घेतला. यामुळे सबंध परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. व वेळीच त्या डुक्कर पकडणाऱ्या व्यावसायिकांनी मोठ्या अथक परिश्रमाने व शिताफिने जाळे टाकून त्या डुकरास जेरबंद केले व त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वेळीच त्याला पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा नागरिकांना नाहक जीवघेणा हल्ला सहन करावा लागला असता. हे जंगली डुक्कर कोठून लोकवस्तीमध्ये शिरले, याची अजिबात कोणालाही कल्पना नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT