Yerawada sakal
पुणे

Yerawada Jail: येरवडात बुद्धिबळाचा पट, सुवर्णपदक प्राप्त कैद्याना शिक्षेत मिळणार माफी

Yerawada Chess Compitition: सुवर्णपदक प्राप्त बंदिवानांना शिक्षेत विशेष माफी देऊन प्रोत्साहन देण्यात आलेले आहे

रूपाली अवचरे

Pune: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (एफआयडीई) व इंडीयन ऑईल यांचे संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे द्वितीय चेस फॉर फ्रीडम या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक 19 ते दिनांक 21 जून या कालावधीत करण्यात आलेले आहे.

या परिषदेचा मुख्य हेतू विविध देशांतील कारागृहांत बंदिस्त असलेल्या बंदिवानांना बुद्धिबळ या खेळामध्ये प्रशिक्षण देऊन विविध देशांतील तुरुंगातील बंदिवानांची स्पर्धा आयोजित करणे व त्यातून बंदिवानांमध्ये तुरुंंगातून सुटका झाल्यानंतर समाजामध्ये गेल्यानंतर आपल्यामध्येसुद्धा काही कौशल्ये आहेत, ज्याआधारे आपण समाजामध्ये आत्मसन्मानाने जगू शकू, असा आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे.

परिवर्तन प्रिझन टू प्राईड नई दिशा या उपक्रमांतर्गत येरवडा कारागृहाच्या बंदिवानांच्या संघाने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेले आहे. या स्पर्धा प्रत्येक वर्षी नवीन देशात आयोजित करण्यात येणार आहेत.

या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता म्हणाले,‘येरवडा कारागृहातील बंद्यांच्या संघाने सुवर्णपदक मिळविले आहे, ही बाब निश्‍चित आनंदाची आहे. त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे कारागृहातील बंदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुढे येत आहेत. याचा आवाका निश्‍चित वाढविण्यात येईल. येथून पुढे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करण्यात येतील. तसेच जास्तीत जास्त महिला बंदिवानांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येईल. सुवर्णपदक प्राप्त बंदिवानांना शिक्षेत विशेष माफी देऊन प्रोत्साहन देण्यात आलेले आहे.

बंदिवान हे आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर बुद्धिबळ खेळत आहेत. मागच्या वर्षी एक प्रयत्न म्हणून आम्ही बंदिवानांसाठी बुद्धिबळ खेळास सुरुवात केली होती आणि आता एका वर्षातच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन येरवडा कारागृहात करण्यात आलेले आहे. सुरुवातीला बंदिवानांना बुद्धिबळाबाबत काहीच माहिती नव्हते. पण त्यांचा रोज चार ते पाच तास तयारी करून मागच्या वर्षी सुवर्णपदक मिळविलेले आहे. बाहेर सर्व सुविधा असणार्‍या खेळाडूंना जे जमणार नाही, ते आमच्या कारागृहातील बंदिवान खेळाडूंनी करून दाखविले. सध्या येरवडा कारागृहात महिला व पुरुष असे 200 बंदी बुद्धिबळ शिकत आहेत.

यावेळी इंडियन ऑईलच्या डायरेक्टर (एचआर) रश्मी गोविल म्हणाल्या, ‘बुद्धिबळामुळे मनाला चालना मिळते व समोर आलेल्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे कौशल्य निर्माण होते.

याप्रसंगी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, इंडियन ऑईलच्या संचालक (मानव संसाधन) रश्मी गोविल, एफआयडीईच्या सामाजिक आयोगाचे अध्यक्ष आंद्रे वोगेटलिन, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नितीन नारंग व एफआयडीई प्राधिकृत परदेशी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT