yerawada-police 
पुणे

पुण्यात मास्क न घालणाऱ्या 24 जणांवर कारवाई

सकाळवृत्तसेवा

पुणे - मास्क जवळ असूनही ते न वापरणाऱ्या 24 जणांवर येरवडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र काही बेफिकीर नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई किंवा गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना पोलिस वारंवार सामाजिक अंतर पाळण्याचे, मास्क वापरण्याचे आणि सतत हात धुण्याचे आवाहन स्पीकरवरून करत आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर येरवडा पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कल्याणीनगर आणि येरवडा परिसरात 24 पुरुष आणि महिला या विना मस्कचे फिरत असताना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात आली. कारवाई केलेल्या बहुतांश पुरुष व महिलांकडे मास्क होते. मात्र बेजबाबदारपणा दाखवत त्यांनी ते तोंडाला लावलेले नव्हते, अशी माहिती येरवडा पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

Beetroot Poriyal: खवलेले खोबरे अन् खमंग फोडणी; १० मिनिटांत बनवा दाक्षिणात्य पद्धतीची बीटरूट पोरियल! पाहा सोपी रेसिपी...

आजचे राशिभविष्य - 22 सप्टेंबर 2026

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT