Attack on Police sakal
पुणे

सराईत गुन्हेगारास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर येरवड्यात हल्ला

येरवडा येथे एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : येरवडा येथे एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांना स्वत:च्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केल्यानंतर जमाव पांगला. ही घटना येरवडा गुरुवारी रात्री साडे साडेनऊ वाजता येरवडा येथील कोतेवस्ती येथे सुमारास घडली. (Pune Crime News)

येरवडा येथील कोते वस्तीमध्ये धर्मसमभाव नावाची म्हाडा वसाहत आहे. स्थानिक रहिवाशांना तेथील शक्‍ती सिंह नावाचा सराईत गुन्हेगार व त्याचे साथीदार त्रास देत होते. याप्रकरणी नागरिकांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, येरवडा पोलिसांचे एक पथक गुरुवारी रात्री शक्‍ती सिंह यास पकडण्यासाठी गेले होते.

त्यावेळी सिंह याने समाजातील नागरिकांना पोलिसांविरुद्ध भडकावले. सिंह याचे ऐकून समाजातील नागरिकांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढविला. त्यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणार्थ पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर नागरिकांचा जमाव पांगला, अखेर पोलिसांनी शक्‍ती सिंह यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT