yerwada gang damage vehicle mcoca act action against them pune police esakal
पुणे

Pune Crime News : येरवड्यात दहशत पसरवून वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीविरुद्ध "मोका'अंतर्गत कारवाई

येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरामध्ये नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा

Pune News : येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरामध्ये नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. जुनेद शेख याच्यासह त्याच्या चार साथीदारांविरुद्ध पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख जुनेद एजाज शेख (वय २३, रा. पवार चाळ, लक्ष्मीनगर, येरवडा), अविनाश ऊर्फ सुक्‍या संजय शिंदे (वय २१, रा. येरवडा), मंगेश ऊर्फ घुल्या दीपक काळोखे (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

निखिल ऊर्फ बॉडी जगन्नाथ शिंदे (वय २३, रा.लक्ष्मीनगर, येरवडा) व त्याचा साथीदार, अशा पाच जणांविरुद्ध "मोका'नुसार कारवाई करण्यात आली आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात फिर्यादी व त्यांचा भाऊ बोलत थांबले होते.

यावेळी जुनेद शेख व त्याचे साथीदार लोखंडी धारदार हत्यारे, दगड घेऊन तेथे आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या हातातील हत्यारे हवेत फिरवून नागरिकांना दमदाटी केली.

त्यानंतर संशयित आरोपींनी फिर्यादी, त्यांचा भाऊ व अन्य नागरिकांच्या २७ वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी जुनेद, अविनाश व मंगेशला अटक केली, तर निखिल व त्याचा साथीदार अद्याप फरारी आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू होता.

त्यावेळी जुनेद शेख हा टोळी बनवून आपल्या साथीदारांसह स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच वर्चस्व वाढविण्यासाठी विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करून टोळीद्वारे दहशत निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले.

प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी त्यांच्याविरुद्धच्या "मोका' अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे सादर केला. त्यास पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT