पुणे

मनोरूग्णालयातील ‘फॅमिली वॉर्ड’ सुरु

दिलीप कुर्हाडे

येरवडा: येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयातील काैटुंबिक कक्ष अर्थात ‘ फॅमिली वॉर्ड ’ गांधी जयंती निमित्त सुरू करण्यात आला. धावपळीच्या जीवनात मानसिक आजार दुप्पटीने वाढत आहे. एकत्र कुटुंब पध्दीचा ऱ्हास, वाढणारा ताण-तणाव, व्यवसनाधिनता यामुळे रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी औषधांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांच्या जिव्हाळ्याची गरज होती. त्यामुळे ‘फॅमिली वॉर्ड’ सुरू केल्याची माहिती अधिक्षक डॉ. अभिजित फडणीस यांनी दिली.

डॉ. फडणीस म्हणाले, ‘‘ मनोरुग्णांना गोळ्या औषधांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांच्या सहवासाची गरज असते. त्यामुळे रुग्ण लवकर बरे होऊन सामाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा जाऊ शकतात. पूर्वी प्रमाणे दैनंदिन जीवन जगू शकतात. त्यासाठी ‘फॅमिली वॉर्ड’ ही संकल्पना आहे. त्यासाठी रुग्णालयात अशा पुरूष व महिला रुग्णांसाठी कक्षांची उभारणी केली आहे. येथे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक राहू शकतात. घराप्रमाणे सोईसुविधांसह दिल्या आहेत. ’’

रुग्णांना नियमित उपचाराबरोबरच नातेवाईकांच्या सहवासामुळे रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. मंगळवारी फॅमिली वॉर्डात आलेल्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. रचना गोस्वामी, उपअधिक्षक डॉ. मधु पाटील, डॉ. मिनाक्षी गोसावी, अधिसेविका वनमाला राठोड, परीवेक्षक अाप्पासाहेब फुंदे उपस्थित होते. 

‘‘बंगलुरु येथील निम्हान्स च्या धर्तीवर मनोरुग्णालयात फॅमिली वॉर्ड सुरू करण्या बाबत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे राज्यातील ठाणे, रत्नागिरी, नागपूर आणि येरवडा अशा चारही प्रादेशिक मनोरुग्णालयात फॅमिली वॉर्ड सुरू करण्यात आले आहे.’’
- डॉ. अभिजित फडणीस, अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT