पुणे

डिझाइनिंग क्षेत्रात नावीन्याचा विचार करा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - डिझाइनिंगचे क्षेत्र वेगळे आहे, त्यामुळे त्यात काम करताना कायम नावीन्यपूर्णतेचा विचार करा. युवा वर्गाला या क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी असल्याचे सांगून डिझाइनतज्ज्ञ भाग्यश्री पटवर्धन आणि वसीम खान यांनी तरुणाईशी संवाद साधला. 

‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)तर्फे आकुर्डीतील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरमध्ये आयोजित यिन टॉक कार्यक्रमाला युवा वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डिझाइन क्षेत्रातील संधी आणि बदलते प्रवाह या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सृजन कॉलेज ऑफ डिझाइनचे संतोष रासकर, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चरचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनावणे, कम्युनिटी नेटवर्क यिनचे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी उपस्थित होते. 

डिझाइनिंगची कला प्रत्येकात असते. मानवी जीवनाशी याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुळे ही कला जोपासताना प्रत्येकाने व्यक्‍त होणे अत्यंत गरजेचे असल्याचे डिझायनर वसीम खान यांनी सांगितले. 

पटवर्धन म्हणाल्या, ‘‘डिझायनिंग क्षेत्रात काम करीत असताना स्वतःची पद्धत विकसित करा. प्रत्येक वेळी आपल्या कामात नावीन्य दिसायला हवे. या क्षेत्रात त्याचा मूलभूत गाभा समजावून घेणे आवश्‍यक आहे. तसे झाले तरच तुम्हाला जे हवे आहे. ते काम तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता. भारत देश हा कला आणि संस्कृतीने समृद्ध आहे. त्यामुळे डिझाइन क्षेत्रात काम करताना नवे तंत्रज्ञान शिकणे, नवे प्रयोग करण्याची कला आत्मसात करणे आवश्‍यक आहे.’’ या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली.

उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. डिझाइनिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिशा आणि प्रेरणा मिळू शकेल. सध्या या क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्‍तींबरोबर प्राध्यापक आणि युवकांना संवाद साधण्याची संधी या उपक्रमामुळे मिळाली.
-डॉ. महेंद्र सोनावणे, प्राचार्य 

यिनतर्फे आयोजित कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी त्यांचा डिझाइन क्षेत्रातील आतापर्यंत अनुभव अगदी सोप्या भाषेत सांगितला.
- प्रीती पवार, सहयोगी प्राध्यापक  

डिझाइनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे करिअर करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा याच्या टिप्स मिळाल्या.
- दिव्या सुरेभान, विद्यार्थिनी 

या कार्यक्रमातील मार्गदर्शन करिअरसाठी उपयुक्‍त ठरणारे आहे. सतत शिकत राहा, आपले वेगळे काम सादर करा, या सल्ल्यामुळे नेमकी दिशा धरून काम करता येईल. 
- सानिया शहा,विद्यार्थिनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT