Yogesh Mhaske  sakal
पुणे

Yogesh Mhaske : ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तपदी योगेश म्हसे;कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नेमणूक

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त राहुल महिवाल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची नियुक्ती केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त राहुल महिवाल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी (ता.२७) काढले. महिवाल यांना नियुक्ती मिळाली नसून त्यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील नियोजन, शहरीकरण आणि विकासासाठी २०१५ मध्ये पीएमआरडीएची स्थापना झाली आहे. पुणे, मावळ, मुळशी, हवेली, भोर, दौंड, शिरूर, खेड, पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यांमध्ये पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र आहे. पीएमआरडीएच्या आयुक्तपदी राहुल महिवाल हे कार्यरत होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह रजेवर असल्याने आयुक्तपदाचा पदभारही महिवाल यांच्याकडेच आहे. म्हसे यांचा रायगडचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच केवळ १३ महिन्यांतच त्यांची बदली झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी म्हसे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. म्हसे हे यापूर्वी तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सीईओ म्हणूनही कार्यरत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT