You are going to university register university administration will register citizens  sakal
पुणे

Pune News : तुम्ही विद्यापीठात फिरायला जाताय!! मग करा नोंदणी!

फिरायला येणाऱ्या नागरिकांची विद्यापीठ प्रशासनातर्फे होणार नोंदणी

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सकाळी किंवा सायंकाळी फिरण्यासाठी जात असाल!! तर इकडे लक्ष द्या. तुम्हाला विद्यापीठात फिरण्यासाठी, व्यायामासाठी जाण्याकरिता आता नावनोंदणी करावी लागणार आहे.

याद्वारे विद्यापीठाच्या आवारात येणाऱ्या नागरिकांची मूलभूत माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून संकलित केली जाणार आहे. विद्यापीठ आवाराच्या आणि तेथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठात सकाळी आणि सायंकाळी व्यायाम आणि विहारासाठी येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ही नोंदणी विनामूल्य असून नोंदणीसाठी विद्यार्थी सुविधा केंद्राजवळील सुरक्षा केबिनमध्ये व सुरक्षा विभाग या दोन ठिकाणी डेस्क ठेवून स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या डेस्कवर नोंदणी अर्ज ठेवण्यात आले असून, तो अर्ज भरून नागरिकांना त्याचठिकाणी जमा करायचा आहे.

ही नोंदणी २८ जानेवारीपर्यंत करण्यात येणार आहे. आगामी काळात नोंदणी धारकांना बायोमेट्रीक प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच सर्व संबंधितांना नोंदणी त्वरित करून घ्यावी, जेणेकरून पुढील गैरसोय होणार नाही, असे आवाहनही विद्यापीठाने केले आहे.

विद्यापीठाच्या आवारात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून प्रतिमहिना शुल्क आकारण्याचा निर्णय विद्यापीठाने जून २०२१मध्ये घेतला होता. यावर प्रचंड टीका झाल्यानंतर अखेर विद्यापीठाला फिरण्यासाठी येणाऱ्यांकडून शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेतला.

विद्यापीठाच्या आवारात औंध, रेंजहिल्स, सांगवी, मॉडेल कॉलनी, पाषाण रस्ता अशा विविध भागातून दररोज सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.

आता विद्यापीठाने फिरण्यासाठी येणाऱ्या या नागरिकांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या आवारात आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही नोंदणी करण्यात येत आहे. या नोंदणीची कार्यवाही सुरक्षा विभागामार्फत करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

‘‘विद्यापीठाच्या आवाराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने नि:शुल्क नाव नोंदणी करण्यात येत आहे.  विद्यापीठाच्या कार्यालयीन कामकाजाच्या आधी आणि नंतरच्या कालावधीत फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे.

या नागरिकांची मूलभूत माहिती विद्यापीठ प्रशासनाकडे असावी या दृष्टिकोनातून नागरिकांच्या नोंदणीचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आवारात फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या नि:शुल्क नावनोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’

- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Asian Games: तिरंदाजीत भारताची 'गोल्डन हॅट्रिक'! महिलांपाठोपाठ पुरुष संघाचेही वर्चस्व; तर नेमबाज नीरु धंडा-कायनान चेनाईचा सुवर्णवेध

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

SCROLL FOR NEXT