youtube sakal
पुणे

Online Fraud : यू ट्यूबला लाइक करण्यासाठी पैशांचे आमिष; ५० लाखांना गंडा

यू ट्यूबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाला ५० लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - यू ट्यूबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाला ५० लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शुलभ नांगर (वय ३४, रा. धानोरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी नांगर यांना मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी यू ट्यूबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी आकर्षक कमिशन मिळेल, असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी नांगर यांना सुरवातीला एक हजार ३५० रुपये कमिशनही दिले.

त्यानंतर टेलिग्राम ॲपवर लिंक पाठवून कमिशनचे आमिष दाखवून व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी ४९ लाख ६८ हजार रुपये घेतले. परंतु त्यापोटी काही मोबदला दिला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नांगर यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत सायबर पोलिसांनी संबंधित टेलिग्राम ॲपधारकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

‘टास्क जॉब’च्या बहाण्याने ७० लाखांची फसवणूक

टेलिग्राम, व्हॉटसॲप आणि इ-मेलच्या माध्यमातून ‘टास्क जॉब’द्वारे पैशांचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याची अन्य एक घटना उघडकीस आली आहे. याबाबत मुफ्फदल महम्मद (वय ४८, रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान घडला.

आरोपींनी महम्मद यांचा विश्वास संपादन करून टास्क दिले. त्यासाठी चार्जेसच्या नावाखाली वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये ७० लाख ३२ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. परंतु त्याचा मोबदला न देता फसवणूक केली.

सायबर पोलिसांचे आवाहन

यू ट्यूबला सबस्क्राइब, लाइक करणे तसेच टेलिग्राम, व्हॉटसॲप आणि इ-मेलच्या माध्यमातून ‘टास्क जॉब’द्वारे पैशांचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. अशा प्रकारे सबस्क्राइब आणि लाइक करून पैसे मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT