arti.jpg 
पुणे

पुणे : 'या' स्वाभिमानी कलाकाराला हवाय मदतीचा हात 

सकाळवृत्तसेवा

कोथरूड : सध्याचा काळ प्रत्येकालाच ताण आणणारा आहे. कोरोनाच्या तडाख्याने हातावर पोट असणाऱ्या अनेक लोकांची रोजची होणारी परवड आता सहन करण्याच्या पलिकडे गेली आहे. गणेश साळुंखे सारख्या चित्रकलेवर नितांत प्रेम असणा-या कलाकारांना कोरोनाचा असाच मोठा आर्थिक फटका बसला.

कलेची कदर करणारे आपल्याकडे आहेत परंतु लॉकडाउनमुळे कलेला सन्मानाने बिदागी देणारा भेटणार तरी कसा. कामाची शाश्वती नसल्याने गणेश बरोबर त्याच्या कुटुंबाची परवड सुरु झाली. दुष्काळात तेरावा यावा त्याप्रमाणे संकटे वाढत चाललेली. बायकोची तब्येत बरी नसल्याने दवाखाना व औषधाचा खर्च वाढला. अशा परिस्थितीत करायचे तरी काय.  मला कोणाचीही मेहेरबानी नको, कष्टाचा मोबदला हवाय हा स्वाभिमानी गणेशचा आग्रह.

गणेशने समाज माध्यमावर एक आव्हान केलं. तुम्हांला आवडणारा तुमचा कोणताही पासपोर्ट साईज फोटो मला पाठवा. मी त्याचे तुम्हाला उत्तम स्केच काढून पाठवेल. त्याच्या या आवाहनाला मित्रांनी भरघोस पाठींबा दिला. एवढेच नव्हे तर आपापल्या संपर्कातील मित्र मंडळींना गणेश विषयी माहिती दिली. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप आणि इतर माध्यमातून गणेशला चित्र काढण्यासाठी ऑफर आल्या.

अखिल भुसारी कॉलनी मित्र मंडळाचे संस्थापक अविनाश दंडवते म्हणाले की, ''माझ्या मित्राने गणेश बद्दल मला कळवले. आम्ही आमच्या मित्र परिवाराला गणेशची माहिती दिली. त्याच्या कलेला योग्य मुल्य देवून गणेशचे कुटूंब सावरण्याचा प्रयत्न केला. असे अनेक गणेश आपल्या आजूबाजूला समाजात आहेत. त्यांना मदतीचा श्रीगणेशा केल्यास तुम्हाला नक्कीच दुवा मिळेल. मी गणेशचा 7745059168 हा नंबर शेअर करत आहे. हाच नंबर गुगल पे साठीपण आहे. तुमची छोटीसी मदत एका कलाकाराला उमेद देईल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT