Engineer girl sexually assaulted sakal
पुणे

Pune Crime: पुण्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! संगणक अभियंता तरुणीवर रिक्षाचालकाकडून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

पुण्यात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे - पहाटे कामावरून घरी परतणाऱ्या एका संगणक अभियंता तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वानवडी परिसरातील काळेपडळ रेल्वेफाटकाजवळ मंगळवारी घडली. या घटनेमुळे या भागातील आयटी कंपन्यांतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी २९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून अनिकेत नानासाहेब मुंजाळ (वय २४, रा. शिवचैतन्यनगर, फुरसुंगी) या रिक्षाचालकाविरुध्द वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंजाळ हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील उंबरे, माळशिरस येथील आहे.

ही तरुणी हडपसर परिसरात एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. ती मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता कंपनीतून रिक्षाने घरी निघाली. परंतु रिक्षाचालक मुंजाळ हा दुसऱ्याच मार्गाने रिक्षा नेत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले.

तिने याबाबत विचारले असता, रिक्षाचालकाने काळेपडळ परिसरात रेल्वे फाटकाजवळ निर्जन ठिकाणी रिक्षा थांबवली. त्याने ही तरुणी एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला तरुणीने विरोध केला.

तिने प्रसंगावधान राखत पोलिस नियंत्रण कक्षास फोन केला. परंतु पोलिस घटनास्थळी पोचेपर्यंत तो रिक्षाचालक पसार झाला होता. शेवटी वानवडी पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे करत आहेत.

महिलांच्या सुरक्षेबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष देणार का?

आयटी कंपनीकडून कर्मचाऱ्यांसाठी कॅबची सुविधा उपलब्ध केली जाते. परंतु या तरुणीला पहाटे रिक्षाने घरी जाण्याची वेळ का आली? तरुणीने प्रसंगावधान राखत नियंत्रण कक्षात कॉल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पोलिस नियंत्रण कक्षातून वानवडी पोलिसांना कॉल केल्यानंतर स्थानिक पोलिस घटनास्थळी पोचले. परंतु तोपर्यंत रिक्षाचालक पसार झाला होता. परंतु या भागातील पोलिस रात्रीच्या गस्तीवर कोठे होते? असे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

या संदर्भात वानवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे आणि तपास अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी काय उपाययोजना करणार, असा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT