Young girl rescued from forced marriage  
पुणे

विवाहित तरुणासोबत जबरदस्तीने लग्न लावलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका 

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन(पुणे) : सोमाटणे येथील हडपसरमध्ये विवाहित तरुणासोबत लग्न लावून सांगली जिल्ह्यात नेलेल्या चौदावर्षीय अल्पवयीन मुलीची सांगली पोलिसांनी सुटका केली. तिला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात दिले.

यासंदर्भात अल्पवयीन मुलीच्या आत्याने फिर्याद दिली. त्यानुसार मुलीचे वडील, आजी आणि वर सागर गायकवाड, सुनीता आणि भटजी (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फुरसुंगी हद्दीत सुनीता नावाच्या महिलेच्या घरी सागर गायकवाड (वय 30, लाडेगाव, ता. वाळवा, जि. सांगली) याच्याबरोबर चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. या मुलीला पिंपरी-चिंचवड येथील विमेन हेल्पलाइन संस्थेच्या अध्यक्षा नीता परदेशी आणि सांगलीतील कुरळप ठाण्यातील पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता. 3) ताब्यात घेतले. हा गुन्हा हडपसर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: योजनेतून आरोग्य सुविधा देणाऱ्या रुग्णालयांची संख्या वाढणार; ससून रुग्णालयाकडे 'ही' जबाबदारी

Motorola Discount Offer : मोटोरोलाचा सर्वात महाग मोबाईल झाला एकदम स्वस्त; आता किंमत फक्त...

Pune Liquor Ban : गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

Maharashtra Employees: महाराष्ट्रातील नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! कर्मचाऱ्यांचा श्वास घोटणारा प्रस्ताव, कामाचे तास वाढणार?

Army Love Story : हमारी अधुरी कहाणी! शहीद मेजर नायर यांची हार्टब्रेकिंग लवस्टोरी; ज्या मुलीवर प्रेम केलं तिला पॅरालिसिस झाला अन्...

SCROLL FOR NEXT