पुणे

शेतात काम करताना मजुराचा मृत्यू

CD

शेतात काम करताना
तरुण मजुराचा मृत्यू

ॲग्रोवन वृत्तसेवा
यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील पाथरी शिवारात कडक उन्हात शेतीचे काम करत असताना २५ वर्षीय तरुण मजुराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. उष्माघात अथवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून वाढत्या तापमानामुळे शेतमजुरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चंद्रशेखर नागोराव कनाके (वय २५, रा. पाथरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विनोद महादेव कनाके (वय ३२, रा. तरोडा, ता. घाटंजी) यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात जबानी रिपोर्ट दाखल केला आहे.
माहितीनुसार, चंद्रशेखर कनाके हे मक्त्याने (करारावर) घेतलेल्या शेतात सकाळी आठ वाजताच्या सुमारास कामासाठी गेले होते. दुपारपर्यंत ते शेतात काम करत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. प्रकृती बिघडल्याने त्यांनी मित्र सचिन ज्ञानेश्वर जांभुळ यांना फोन करून शेतात बोलावले. यानंतर जांभुळ यांनी चंद्रशेखर यांना तातडीने ऑटोरिक्षाद्वारे उमरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांना दिलेल्या जबानीत मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळेत उन्हात काम टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पुढील तपास पांढरकवडा पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT