crime  sakal
पुणे

विरोधकासोबत फिरल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार

अक्षय अभंग व आकाश गोरड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विरोधकासोबत फिरत असल्याच्या रागातून टोळक्‍याने तरुणाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. हि घटना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनीस दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अक्षय अभंग व आकाश गोरड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोकेश पगारे (वय 20, रा.अप्पर इंदिरा नगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Pune News)

त्यावरुन अटक केलेल्या आरोपींसह सात जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पगारे हा बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या दुचाकीवरुन व्हिआयटी रस्त्याने घरी जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याची दुचाकी अडविली. त्यानंतर त्याला "तु भावेश गायकवाड सोबत का फिरतो' असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी कोयत्याने फिर्यादीच्या डोक्‍यात वार केले. तसेच रस्त्याच्याकडेला पडलेले पेव्हर ब्लॉक फिर्यादीच्या तोंडवर व हातावर मारून त्यास गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादीच्या दुचाकीचीही तोडफोड करून आरोपींनी कोयते हातात घेत, आरडाओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेनंतर परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नास नकार दिल्याने घटस्फोटीत तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या; हिंदू संघटना आक्रमक, आरोपी रफीकचा जंगलात आढळला मृतदेह

मुहूर्त ठरला! झी मराठीची 'शुभ श्रावणी' 'या' दिवशी येणार भेटीला; नव्या मालिकेसाठी 'या' सिरीयलला फटका

बाबो...! तमन्नाने सहा मिनिटांसाठी घेतले 6 कोटी, नवीन वर्षाच्या पार्टीत तमन्ना भाटियाची धमाकेदार नृत्य, Viral Video

अर्जुन तेंडुलकर-सानिया चंढोक यांच्या लग्नाची तारीख ठरली; सचिन तेंडुलकरचा लेक लवकरच चढणार बोहोल्यावर

Viral Video : 'माझ्या घरात तिला ठेवायला जागा नाही'..आईला वृद्धाश्रमात सोडणारी निर्दयी मुलगी; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT