young man drowned in the Khadakwasla Dam police pmrda  sakal
पुणे

Khadakwasla Dam : खडकवासला कालव्यात पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला

पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाकडून शोध सुरू

निलेश बोरुडे

किरकटवाडी: खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कालव्यात पोहण्यासाठी आलेला तरुण बुडाल्याची माहिती मिळाली असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांकडून त्याचा शोध सुरू आहे. जुबेर इस्माईल शेख (वय 28, रा. भवानी पेठ, पुणे) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

जुबेर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इतर तीन मित्रांसह खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कालव्यात पोहण्यासाठी आला होता. जुबेरला पोहता येत होते मात्र त्याच्यासोबत आलेल्या इतर तिघांना पोहता येत नसल्याने ते काठावर बसून पाहत होते. पोहत असलेला जुबेर अचानक दिसेनासा झाल्याने मित्रांनी आरडाओरड केली. इतर पोहणारांनीही जुबेरला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो सापडला नाही.

याबाबत पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज माळी,चेतन खमसे, अक्षय काळे, अतुल रोकडे व विठ्ठल घोडे या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शोध सुरू केला आहे मात्र सध्या कालव्यातून 1054 क्युसेकने उन्हाळी आवर्तन सुरू आहे त्यामुळे पाण्याला वेग जास्त असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत.

शेकडोंची गर्दी आणि जीवघेणे स्टंट...

धरणाच्या मागच्या बाजूला कालव्यात पोहण्यासाठी शेकडो तरुण शहराच्या वेगवेगळ्या भागातून येतात. अनेक तरुण, लहान मुले कालव्यावरील पुलावरुन, संरक्षक भींतीवरुन व थेट वीजनिर्मिती प्रकल्पाच्या भींतीवरुन जीवघेणे स्टंट करत उड्या मारतात. पहिल्यांदा पोहण्यासाठी आलेल्यांना पाण्याचा अंदाज येत नाही, परिणामी यापुर्वीही अनेकांचा बुडून मृत्यू झालेला आहे. पाटबंधारे विभागाने या ठिकाणी पाण्यात उतरु नये म्हणून फलकही लावलेला आहे मात्र त्याची कोणीही पर्वा करताना दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT