पुणे

शिवगंगा नदीच्या पुरात उडी घेणारा तरुण बेपत्ता

किरण भदे

नसरापूर : भोर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुर आलेल्या शिवगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेला एक विवाहित तरुण बेपत्ता झाला आहे. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे. मात्र सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा वाढता प्रवाहामुळे शोधकार्य मोहीम मध्ये अडचणी निर्माण होत आहे.

सलीम सुलतान शेख वय २९, रा. कांजळे ( ता. भोर ) असे तरुणाचे नाव असून गुरवारी (ता २२) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास कांजळे गावच्या स्मशानभूमी जवळ शिवगंगा नदीच्या पुरात सलीम शेख हा त्याचा मित्र नवनाथ जाधव याच्या समवेत पोहण्यासाठी गेले होता. यावेळी सलीम हा अंगावरील कपडे काढून एकटाच पोहण्यासाठी नदीत उतरला. मात्र पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने सलीम हा पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाला.

सलीम शेख हा वाहून गेल्याचे लक्षात आल्यावर राजगड पोलीस, गावातील तरुण आणि मच्छिमार तसेच भोर येथील भोई समाजातील तरुणांनी शिवगंगा नदी पात्रात सलीमचा शोध सुरू केला असल्याची माहिती येथील ग्रामपंचायत सदस्य नाना जाधव यांनी दिली. सुरू असलेल्या पावसामुळे नदी - नाल्यामधील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.

पोलिस निरीक्षक संदिप घोरपडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवासरे, उपनिरीक्षक निखिल मगदूम, हवालदार सतीश चव्हाण, उमेश जगताप, खंडेराव ताठेले यांच्या पथकाने स्थानिक तरुणांसह शोध मोहीम सुरू ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT