Cheating sakal
पुणे

मॅट्रीमोनी साईटवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीची केली २४ लाखांची फसवणूक

मॅट्रीमोनी संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून व वेगवेगळी कारणे सांगून शहरातील एका उच्चशिक्षित तरुणीला एका तरुणाने २४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

सकाळ वृत्तसेवा

मॅट्रीमोनी संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून व वेगवेगळी कारणे सांगून शहरातील एका उच्चशिक्षित तरुणीला एका तरुणाने २४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

पुणे - मॅट्रीमोनी संकेतस्थळावर (Matrimony Website) ओळख झाल्यानंतर लग्नाचे (Marriage) आमिष दाखवून व वेगवेगळी कारणे सांगून शहरातील एका उच्चशिक्षित तरुणीला (Girl) एका तरुणाने २४ लाख रुपयांचा गंडा (Cheating) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने खोट्या नावाने नोंदणी करून तरुणीला फसविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ३१ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार निशांत रमेशचंद्र नंदवाणा (रा. किशनगंज, राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी उच्चशिक्षित असून तिने शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. आरोपीने या संकेतस्थळावर अधितांश शिवप्रकाश अग्निहोत्री नावाने नाव नोंदणी केली होती. या ठिकाणी तरुणीची आरोपीसोबत ओळख झाली. आरोपीने तो सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर या ठिकाणी नोकरीला असल्याचे सांगितले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीकडून आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून २४ लाख रुपये घेतले. त्यानंतर आरोपीने तरुणीशी संपर्क कमी केला.

आरोपी तरुणींचा विश्‍वास संपादन करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवत. त्यानंतर त्यांचा अश्‍लील व्हिडिओ काढून त्याआधारे पैसे मागत त्यांची फसवणूक करीत असल्याचे एका गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील देखील एका तरुणीशी आरोपीने अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे समोर आले होते. या गुन्ह्याचा तपास करत वाकड पोलिसांनी राजस्थान येथे जाऊन नंदवाणा याला पकडले. तोच दुसऱ्या नावाने महिलांना मॅट्रीमोनी साईटवरून फसवणूक करत असल्याचे आढळून आले. त्याने पुणे परिसरातील उच्च शिक्षित तरुणीची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक केली आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे हे अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT