Viral Video Sakal
पुणे

Viral Video : रेल्वेच्या डब्यावर चढून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न, वीजवाहिनीला स्पर्श...

प्रफुल्ल भंडारी

दौंड - दौंड रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या वर चढून वीजवाहिनीला स्पर्श करण्याची धमकी देणार्या एका विमनस्क तरूणास शिताफीने खाली उतरविण्यात आले आहे. रेल्वे कर्मचार्यांच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटना टळली आहे.

रेल्वे स्थानकात सकाळी पावणेआठ वाजता फलाट क्रमांक पाच व दोन मधील मेन लाइन वर थांबलेल्या मालगाडीवर एक तरूण चढला. डब्यावर चढून तो त्यावरील उच्च क्षमतेच्या वीजवाहिनीला स्पर्श करून आत्महत्या करणार असल्याची धमकी देत होता. दरम्यान कर्तव्यावर असणार्या रेल्वे कर्मचारी व अधिकार्यांनी ही माहिती वरिष्ठांना देताच त्या वाहिनीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. कर्मचारी त्याला खाली उतरण्याचे आवाहन करीत होते परंतु तो हात उंचावून स्पर्श करण्याची धमकी देत होता.

दरम्यान, एका रेल्वे कर्मचार्याने डब्यावर चढून त्याला धरले आणि दुसर्या बाजूने अन्य एकाने त्याला धरून खाली उतरविले. खाली उतरताच तरूणाने पळायचा प्रयत्न केला. परंतु त्याला पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या ताब्यात देण्यात आले. सदर तरूण हा मध्यरात्रीपासून दौंड स्थानकावर ओरडत फिरत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT