पुणे

हेड ‘जेन-झीं’ना आवडे वाराणसी

CD

नवी दिल्ली, ता.२१ (वृत्तसंस्था) ः विविध सामाजिक आंदोलनांमध्ये सक्रिय असणारी तरुणाई भ्रमंती आणि प्रवासाबाबत देखील अधिक काटेकोरपणे नियोजन आखताना दिसते. सध्या सणासुदीच्या काळात ही तरुण मंडळी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्रांना भेटी देत आहे. समुद्र किनाऱ्यांवर वसलेल्या शहरांमध्येही त्यांना फिरायला आवडते, असे ‘एअरबीएनबी’च्या डेटामधून उघड झाले. सणासुदीच्या काळामध्ये देशातील तरुण पर्यटकांच्या संख्येमध्ये मागील काही वर्षांत चाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे. यातील बहुसंख्य हे ‘जेन-झी’ आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत तीस टक्क्यांची वाढ झाली आहे.

गोवा, कोलकता आणि बंगळूरवर भर
- पर्यटनासाठी वाराणसी हे तरुणाईचे सर्वांत आवडते ठिकाण आहे. त्यापाठोपाठ उत्तर गोवा, दक्षिण गोवा, कोलकता आणि बंगळूर यांचा क्रम लागतो. वाराणसी हे आध्यात्मिक ठिकाण असून कोलकता सण आणि उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. गोव्यातील समुद्र किनारे हे पर्यटकांना घालत असल्याचे दिसते तर बंगळूरमध्ये तरुणाई नागरी अनुभव घेण्यासाठी जाते.

प्रवासात शोध कशाचा?
- सांस्कृतिक अनुभव
- समुद्र किनाऱ्यांवरील शांतता
- मेट्रो शहरांतील जीवनमान

प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात भारतीय पर्यटकांचा भर हा देशांतर्गत पर्यटनस्थळांना भेटी देण्यावर आहे. यातही जेन-झी आघाडीवर असल्याचे दिसते. या पर्यटकांना स्थानिक समुदायांसोबत मिसळायला आवडते, त्यांच्यासोबत अधिक वेळ घालविण्यावर त्यांचा भर दिसतो. सणांच्या काळामध्ये सुट्या असल्याने अनेकांचा सहकुटुंब पर्यटनाला जायचा बेत असतो. याबाबतीत कुटुंबाकडून होणाऱ्या सर्चिंगमध्ये चाळीस टक्के एवढी वाढ झाल्याचे दिसते.
- अमनप्रीतसिंग बजाज, ‘एअरबीएनबी इंडिया’चे प्रमुख
------
कौटुंबिक
पर्यटन कोठे?
- श्रीनगर
- कांगडा
- अमृतसर
- गुवाहाटी
- नाशिक
- पूर्व खासी टेकड्या
- अरुणाचल प्रदेश
- शिमला
- मनाली
----------
‘विंग्ज ओव्हर गंगाज’
भारतीय हवाई दलाकडून उद्यापासून (ता.२२) वाराणसीमध्ये हवाई कसरतींचे आयोजन करण्यात येईल. ‘नमो घाटा’वर बसून भाविकांना त्या पाहता येतील. ‘विंग्ज ओव्हर गंगाज’ अशी थीम या कसरतींसाठी ठेवण्यात आली आहे. उद्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहतील. जवळपास शंभर विमाने यामध्ये सहभागी होतील, त्यात ५२ लढाऊ विमाने, १५ मालवाहू आणि ३२ हेलिकॉप्टरचा देखील समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Data Leaked: HDFC बँकेत खळबळ! गोपनीय माहिती बाहेर कशी गेली?

SA vs AUS 2nd Test : दक्षिण आफ्रिकेने 'फास' आवळला! रबाडाच्या 154.5 kph वेगाच्या चेंडूने हेड हडबडला... यान्सेनने करेक्ट कार्यक्रम केला

“ कधी-कधी बाबांना स्टेशनवर झोपायला लागायचं” ललित प्रभाकर बालपणीच्या आठवण सांगताना म्हणाला, 'वन रुम किचनमध्ये बाथरूम, मोरी'

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी आणखी एकाला अटक, गुजरातमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात

Anushka Gurav Success Story : अंगणवाडी सेविकेची लेक थेट अमेरिकेत! मसूरच्या अनुष्का गुरवची आंतरराष्ट्रीय कंपनीत 'सॉफ्टवेअर इंजिनिअर' म्हणून निवड, सिस्को कंपनीत मिळवले मोठे पॅकेज

SCROLL FOR NEXT