Army Sakal
पुणे

पुण्यातील तरुणींनी काश्मीर खोऱ्यात भारतीय सैनिकांना राखी बांधून सण साजरा केला

देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पुण्यातील तरुणींनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम राबविला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी (Jawan) पुण्यातील तरुणींनी (Pune Girls) रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम राबविला. विधी अभ्यासक्रमाची विद्यार्थी गौरी किणीकर व तिच्या सहकाऱ्यांनी काश्मीर येथील मच्छल खोऱ्यात भारतीय सैनिकांना राखी बांधून हा सण साजरा केला.

या उपक्रमांतर्गत सुमारे दोन हजार राख्या काश्मीरमधील सैनिकांना व तेथील काश्मिरी बांधवाना बांधण्यात आल्या. तसेच त्यांना फराळ वाटण्यात आला. हा उपक्रम काश्मीरच्या मच्छल, पुश्वरी, काटवार आणि डब्पाल या गावात 19 ते 22 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आला. या प्रसंगी साधना किणीकर, शताक्षी किणीकर, शिवानी जोशी, सई नंदूकर तसेच लष्करी अधिकारी, जवान व स्थानिक उपस्थित होते.

याबाबत गौरी म्हणाली, 'दरवर्षी आम्ही घरीच रखीपौर्णिमा साजरी करतो. सीमेवर तैनात सैनिकांमुळे आज स्वतंत्रपणे सर्व सण सोहळे साजरे करता येतात. मात्र हे सैनिक आपल्या कुटुंबियांपासून लांब राहून कर्तव्य पार पडतात. तसेच काश्मीर येथील ग्रामस्थांना ही आपल्या संस्कृतीची माहिती मिळावी हा मुख्य उद्देश होता. त्यामुळे या बांधवांसोबत यंदा राखीपौर्णिमा साजरी करण्याचे ठरविले. यासाठी भारतमाता महिला मंडळ ट्रस्ट व देशातील इतर संस्थानी सहकार्य केले.'

कलम 370 रद्द केल्याच्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाले असून काश्मीरची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. नुकताच झालेल्या स्वतंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागातू हे सिद्ध झाले आहे. तर सैनिकांना बांधण्यात आलेल्या राख्यांमुळे राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याचे वचन अधिक बळकट झाले आहेत. असे लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT