पुणे

सावधान! नोकरदार तरुणाई ‘सेक्‍सटॉर्शन’ची शिकार

खंडणीची केली जातेय मागणी; सायबर पोलिसांकडे दोन गुन्हे तर १५० तक्रारी

पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनमुळे घरून काम करणारा अमित (नाव बदललेले आहे) फेसबुक पाहत असताना त्याला एका अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारल्यानंतर त्यांच्यात व्हॉटसअप कॉलही सुरू झाले. एकदा तिने व्हॉटसअप कॉल करून त्यास नग्न होण्यास सांगितले. त्यानेही प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच अमितच्या व्हॉटसअपवर त्याचा नग्न व्हिडिओ (न्यूड कॉल) येऊन धडकला. अमित घाबरला. त्यानंतर त्या तरुणीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली. असा प्रकार फक्त अमितबाबत घडला नाही, तर लॉकडाउनच्या कालावधीत असे ‘सेक्‍सटॉर्शन’चे दोन गुन्हे तर सुमारे १५० तक्रार अर्ज सायबर पोलिसांकडे आले आहेत.

कसे अडकविले जाते

लॉकडाउनमुळे बहुतांश नागरिक, कंपन्यांमधील कर्मचारी घरूनच काम करत आहेत. अशा नागरिकांकडून मनोरंजनासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजरवर काही वेळ घालविला जातो. त्याचवेळी संबंधित नागरीकांना अनोळखी तरुणी किंवा तरुण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितो. त्यानंतर ओळख वाढवून व्हॉटसअप कॉलद्वारेही संवाद साधला जातो. संबंधित व्यक्तींचा विश्‍वास संपादन केल्यानंतर त्यांना नग्न होण्यास किंवा अश्लील प्रकार करण्यास सांगितले जाते. काहीजण नकळतपणे त्यांना प्रतिसाद देतात. त्यानंतर सायबर गुन्हेगार काही दिवसांनी हे व्हिडिओ त्यांना पाठवून बदनामीची धमकी देतात. त्यानंतर त्यांच्याकडून खंडणी उकळण्यास सुरूवात करतात. काही नागरिक प्रतिष्ठेला घाबरून तत्काळ पेटीएम किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे देऊन मोकळे होतात तर विरोध करणाऱ्यांना मानसिक त्रास देत ब्लॅकमेल केले जाते.

कोण अडकते जाळ्यात?

श्रीमंत कुटुंबातील मुले, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा व्यक्तींशी सायबर गुन्हेगार ओळख वाढवितात. त्यानंतर खंडणी वसुलीचे प्रयत्न होतात. भीती व बदनामीमुळे नागरिक, तरुण पैसे देऊन मोकळे होतात. काही नागरीकांना अशा प्रकारांमुळे प्रचंड मानसिक दडपण येऊन त्यांच्या जिवाला धोका पोचण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नाहक बदनामी होईल, प्रतिष्ठेला बाधा पोचेल, यामुळे अनेक नागरिकांकडून तक्रार दाखल केली जात नाही.

''सायबर गुन्हेगार तरुण, नोकरदारांशी फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवितात. व्हॉटसअपद्वारे त्यांना अश्लील प्रकार करण्यास सांगून तेच व्हिडिओ त्यांना पाठवितात. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे मागण्यास सुरूवात होते. सायबर पोलिसांकडे याप्रकरणी दोन गुन्हे व १५० तक्रार अर्ज आले आहेत.''

- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

अशी घ्या काळजी !

  1. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.

  2. परिचित नसलेल्यांशी व्हॉटसअप कॉलींगद्वारे संवाद साधू नका.

  3. व्हिडिओ, छायाचित्र पाठविताना विचार करा.

  4. चुकीचे घडत असल्यास कुटुंबातील व्यक्ती, मित्र-मैत्रिणी किंवा पोलिसांशी संवाद साधा.

इथे करा संपर्क -

सायबर पोलिस ठाणे ः ०२०- २९७१००९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT