pune sakal
पुणे

Pune : आंबेगावात युवा संवाद सामाजिक संस्थेकडुन माहिती अधिकार दिन साजरा

खरा कायदा तोच असतो ज्याचा सर्वसामान्य नागरिकाला फायदा होतो विद्यार्थीदशेतच आपल्या देशाचे भवितव्य घडत असते

सकाळ वृत्तसेवा

आंबेगाव : आपल्या न्याय आणि हक्कासाठी माहितीचा अधिकार ही मोठी ताकद आपल्याला शासनाने देऊ केली आहे. खरा कायदा तोच असतो ज्याचा सर्वसामान्य नागरिकाला फायदा होतो. विद्यार्थीदशेतच आपल्या देशाचे भवितव्य घडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना माहिती अधिकाराचा पाया माहिती असणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन ऍड. रवींद्र नरभवर यांनी केली. माहिती अधिकार दिनानिमित्त माहितीपर व्यख्यानात ते बोलत होते.

२८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन सर्वत्र साजरा करण्यात यावा असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने महात्मा फुले विद्यानिकेतन संस्था संचालित शारदा प्राथमिक आणि श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय टेल्को कॉलनी दत्तनगर येथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीपर व्यख्यानाने साजरा करण्यात आला.

यावेळी युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड म्हणाले की,लोकांना माहिती अधिकाराचे महत्व पटवून सांगणे काळाची गरज आहे. २००५ पासून अंमलात आलेल्या या विशेष अधिकाराची नागरिकांना जाण करून देण्यासाठी माहिती अधिकार दिन मोठ्या प्रमाणात साजरा कराला हवा असे गरड म्हणाले.यावेळी पायल दूधभाते, तृप्ती मरगळे, पूनम चौधरी विद्यार्थ्यांनींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी,श्री शिवाजी माध्यमिक मुख्याध्यापक शिवाजी शिंदे, गौतम बामणे,युवा संवाद सामाजिक संस्थेचे विश्वास सूर्यवंशी,मोहनीश नायर,पत्रकार संतोष गाजरे,यांचेसह विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT