Accident Sakal media
पुणे

Pune Accident News : येरवड्यात कॉमर झोन रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी : येरवड्यामधील कॉमर झोन रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. येरवड्यातील मेंटल हॉस्पिटलसमोर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात अज्ञात वाहनाने चिरडल्यामुळे दुचाकीवरील परेश सुनील गलियाल (वय 26, रा महा. हौ. बोर्ड, येरवडा) याचा मृत्यू झाला आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा अपघात झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार कॉमर्स झोनकडून मेंटल हॉस्पिटलसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

रुग्णवाहिका येण्यासाठी विलंब झाल्यामुळे या भागातील वाहतूक सुमारे तासभर बंद ठेवण्यात आली होती. अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत. हा रस्ता अतिशय अरुंद असून येथे वारंवार छोट्यामोठया अपघाताच्या घटना घडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT