youth dies in shaniwar peth online complaint that branch should be removed as it dangerous esakal
पुणे

Pune News : शनिवार पेठेत तरुणाचा मृत्यू; फांदी धोकादायक झाल्याने ती काढून टाकावी अशी ऑनलाइन तक्रार

शनिवार पेठेत वर्तक बागेच्या कोपऱ्यावरील उंबराच्या झाडाची फांदी डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : शनिवार पेठेत वर्तक बागेच्या कोपऱ्यावरील उंबराच्या झाडाची फांदी डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला. ही फांदी धोकादायक झाल्याने ती काढून टाकावी अशी ऑनलाइन तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती.

मात्र, संबंधित हॉर्टिकल्चर मिस्त्रीने झाडाची फांदी न तोडतच ही तक्रार बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यास कारने दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनीही याप्रकरणात कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अमोल पवार यांनी हॉर्टिकल्चर मिस्त्री ज्ञानोबा बालवडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वर्तक बागेच्या कोपऱ्यावर मित्रांसोबत कॉफी पीत असताना अजिभित गुंड यांचा झाडाची वाळलेली फांदी डोक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २६) सांयकाळी पावणे पाचच्या सुमारास घडली.

या ठिकाणी दिवसभर चहा, कॉफी पिण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. येथील उंबराच्या झाडाच्या फांद्या वाळल्या असून, तो पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फांद्या कापून टाकाव्यात अशी ऑनलाइन तक्रार गणेश पाचरकर यांनी २९ जुलै रोजी केली होती.

पण त्यानंतर कोणतीही कारवाई न करता ही तक्रार थेट बंद करण्यात आली. पण या तक्रारीची दखल न घेतल्याने एका तरुणाला जीव गमावला लागला आहे. सहाय्यक आयुक्त अमोल पवार म्हणाले, ‘‘झाडाच्या फांदीसंदर्भात ३१ जुलै रोजी बालवडकर यांच्या लॉगइनला तक्रार दाखल झाली. त्यानंतर त्यांनी ८ ऑगस्टरोजी ही तक्रार बंद केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’’

ऑनलाइन तक्रार आल्यानंतर त्यावर योग्य पद्धतीने कार्यवाही करून तक्रार बंद करणे आवश्‍यक आहे. वर्तक बाग येथील प्रकरणात तक्रार बंद केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच यापुढे ऑनलाइन तक्रार परस्पर बंद करणे खपवून घेतले जाणार नाही.’’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Stock Price: डीमार्टच्या प्रॉफिटमध्ये 15 टक्के वाढ; तरीही शेअर 3 टक्के घसरला, गुंतवणूक करावी का?

'फुलपाखरू' मालिका अर्ध्यातच का सोडलीस? चेतन वडनेरेने सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'एक वेळ अशी आली जेव्हा...'

INDW vs PAKW: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतरही हरमनप्रीत कौर नाराज! म्हणाली, आता मायदेशात गेल्यानंतर...

RSS History: अभ्यासक्रमात आता 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास'; 'या' विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Natural Collagen Boosters: सप्लीमेंट्स विसरा! 'या' 5 नैसर्गिक पदार्थांनी वाढवा कोलेजन, त्वचारोगतज्ज्ञांनी शेअर केला खास Video

SCROLL FOR NEXT