Tushar Gholap Sakal
पुणे

खडकवासला धरणात बुडून तरुणाचा मृत्यू; पाणबुड्यांनी शोधला मृतदेह

कुडजे (ता. हवेली) गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

निलेश बोरुडे

कुडजे (ता. हवेली) गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

किरकटवाडी - कुडजे (ता. हवेली) गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या (Khadakwasala Dam) पाण्यात बुडून एका तरुणाचा (Youth) मृत्यू (Death) झाला आहे. दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात अखेर पोलीस प्रशासनाला यश आले आहे. तुषार निवृत्ती घोलप (वय 33 रा. दांगट पाटील नगर, शिवणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 3 मार्च रोजी तुषार कुडजे गावाच्या हद्दीत दुपारच्या सुमारास खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी म्हणून गेला होता. पाण्याच्या कडेला त्याचे कपडे होते. सायंकाळच्या सुमारास काही स्थानिकांना पाण्याच्या कडेला कपडे दिसले परंतु आजुबाजुला पाण्यात कोणी दिसले नाही म्हणून याबाबत पोलीसांना माहिती देण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला परंतु पाणी खोल असल्याने व अंधार असल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

आज दि. 4 मार्च रोजी सकाळपासून पुन्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले होते. पाण्याची माहिती असल्याने स्थानिक भोई समाजातील नागरिकांनीही जवानांना मदत केली. दुपारच्या सुमारास मुळशीच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पानबुड्यांनी खोल पाण्यातून तुषारचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढला. त्यावेळी हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस नाईक गणेश धनवे, उत्तमनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, किरण देशमुख व कुडजेचे पोलीस पाटील दत्ता पायगुडे घटनास्थळी उपस्थित होते. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT