पुणे

तरुणाईचा फिटनेस फंडा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी -  बदलती जीवनशैली आणि त्यामुळे जडणारे आजार लक्षात घेता सध्या तरुणाईचा कल व्यायामाकडे वाढला आहे. वाढता स्थूलपणा सध्या तरुणांच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून ‘डाएट’, जिम किंवा व्यायामशाळेचा आधार घेताना ते दिसत आहेत.

निरोगी शरीर राहावे, यासाठी संवेदनशील असलेली तरुणाई बऱ्याचदा सोशल मीडियातील व्हिडिओ पाहून ‘डाएट’ करताना दिसते. त्यामुळे सुयोग्य जीवनशैलीचा अवलंब, समतोल आहार, पुरेसा व्यायाम आणि योग्य ‘डाएट’ उपयुक्त ठरू शकते, असे मत आहारतज्ज्ञांचे आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत सकाळी आणि सायंकाळी व्यायाम करण्यावर तरुण-तरुणींचा भर आहे. शहरात महापालिकेच्या ८०, खासगी सुमारे २५ ते ३० व्यायामशाळा आहेत. तेथे वजनी गटाचे व्यायाम, क्रॉस फिट, योगा, झुम्बा, किकबॉक्‍सिंग, पिलाहीज, स्पिनिंग, ॲरोबिक्‍स आदी व्यायाम प्रकार केले जातात. व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसावे, शारीरिक व मानसिकदृष्ट्या ‘फिट’ राहावे, यासाठी प्रामुख्याने व्यायामाबाबत ते जागरूक असल्याचे चित्र आहे. तरुणांचा प्रामुख्याने कल व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करण्याकडे आहे. ज्यांना ते शक्‍य होत नाही, ते उद्यानात जाऊन खुल्या व्यायामशाळेत (ओपन जिम) व्यायाम करताना दिसतात. 

आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्यप्रकारे ‘डाएट’ करावे. आहारात हिरव्या पालेभाज्या, सॅलड, फळे यांचा समावेश असावा. आहारासोबत पाण्याचे प्रमाणही पुरेसे असावे. 
- ऋतुजा रसाळ, क्‍लिनिकल डायटीशियन 

व्यायामामुळे शारीरिक, मानसिक क्षमतेत वाढ होते. रोज ४५ मिनिटे ते १ तास व्यायाम करण्याकडे तरुणांचा कल आहे.
- विशाल कोतले, जिम पर्सनल ट्रेनर

रोज नियमित जिममध्ये जातो. त्यामुळे माझी शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी खूप फायदा होत आहे.
- शिवम भूमकर, तरुण

तरुणांमध्ये वाढता स्थूलपणा चिंतेचा विषय आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीची आहारपद्धती यामुळे प्रामुख्याने हा आजार वाढत आहे. आपण आपली जीवनशैली आरोग्यदायी केल्यास त्यावर मात करता येईल. 
- डॉ. सीमा निकम, आहारतज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT