satyshil sherkar 
पुणे

सत्यशील शेरकर यांनी मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

ओझर (पुणे) : विघ्नहर सहकारी साखर कारखान्यचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी घरी बोलावून मारहाण केल्याचा आरोप जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे अनधिकृतपणे मनोरुग्णांची संस्था चालवत असलेल्या अक्षय मोहन बोऱ्हाडे या तरुणाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. मात्र, शेरकर यांनी संबंधित आरोप फेटाळले असून, मारहाणीचा प्रकार घडला नसल्याचा खुलासा केला आहे. 

बोऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोप केला आहे की, गेल्या तीन वर्षापासून मी व माझे कुटुंब या संस्थेच्या माध्यमातून समाजातील निराधार व मनोरूग्णांची सेवा करत आहे, त्यांना आधार देण्याचे काम करत आहे. परंतु, माझे चांगले काम गावातील काही व्यक्तींना सहन न झाल्यामुळे सत्यशील शेरकर यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवून घेऊन मारहाण केली आहे.
 

शेरकर यांनी आरोप फेटाळले

याबाबत शेरकर यांनी खुलासा केला की, सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत आहे. बोऱ्हाडे यांनी दोन दिवसांपूर्वी मंचरहून एक आजारी मनोरुग्ण आणला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या संस्थेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास गावाचे आरोग्य धोक्‍यात येईल, असे होऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी त्यास घरी बोलावले होते. यावे ळी त्यास सद्यस्थिती समजून सांगितली. मात्र, ग्रामस्थांचे म्हणणे समजून न घेता अरेरावीची उत्तरे देत तो निघून गेला व फेसबुकच्या माध्यमातून मी त्यास मारहाण केल्याचे आरोप करत आहे. 

दरम्यान, महिला व बालविकास विभागाची मान्यता न घेता शिवऋण प्रतिष्ठान या नावाने अनधिकृत संस्था सुरू केल्याच्या आरोपावरून संस्थाचालक अक्षय बोऱ्हाडे यांच्याविरुद्ध जुन्नर पोलिसांनी या पूर्वी गुन्हा दाखल केलेला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT