accident sakal
पुणे

कुत्र्यास वाचवण्याच्या प्रयत्नात दोन चारचाकी गाड्यांची धडक झाल्याने युवकाचा मृत्यू

दोन चारचाकी वाहनाच्या झालेल्या धडकेत अझहर मुख्तार पठाण या सिव्हील इंजिनियर युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

डॉ. संदेश शहा

दोन चारचाकी वाहनाच्या झालेल्या धडकेत अझहर मुख्तार पठाण या सिव्हील इंजिनियर युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

इंदापूर - इंदापूर बारामती राज्य मार्गावर निमगाव केतकी नजीक हेगडे वस्तीलगत दोन चारचाकी वाहनाच्या झालेल्या धडकेत अझहर मुख्तार पठाण (वय २३ वर्ष, रा. ४० फुटी रोड, दर्गाह मस्जिद चौक, शिवशंभो मंदिरासमोर, इंदापूर) या सिव्हील इंजिनियर युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहरातील प्रसिद्ध कंत्राटदार मुख्तार पठाण यांचा तो मोठा मुलगा असून या अपघातात अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात दि. ७ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता घडला असून, यासंदर्भात सरफराज मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टाटा टियागो वाहन चालका विरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अझहर पठाण हे आपले मामा समीर मुलाणी, मावशी सायरा मुसा खान, मावस बहीण सलोनी मुसा खान व मावस भाऊ आफताब मुसा खान यांच्याबरोबर ह्युंदाई कंपनीच्या सँट्रो ( क्र. एमएच ४२ एएक्स ५७९८) गाडीतून निमगाव केतकी बाजू कडून इंदापूरच्या दिशेने निघाले होते, तर टाटा टियागो (क्र. एमएच १३ डीटी ४१२२) भरधाव वेगाने इंदापूर कडून निमगाव केतकी कडे निघाली होती. हेगडे वस्तीजवळ कुत्र्यास वाचवताना चालकाचे नियंत्रण सुटलेल्या टियागोने विरुद्ध दिशेस जावून समीर मुलाणी चालवत असलेल्या सँट्रो गाडीस वाहन चालक सिटच्या पाठीमागील बाजूस जोरदार धडक दिली. त्यामुळे वाहन चालकाच्या पाठीमागे बसलेल्या अझहर पठाण याच्या डोक्याला गंभीर इजा होवून टियागो ७० फुटांपेक्षा जास्त अंतरावर उजव्या बाजूस झुडूपांमध्ये जाऊन अडकली.

अपघातानंतर अझहर पठाण याला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी अझहर यास औषधोपचार करण्यापूर्वी मृत असल्याचे घोषित केले. अन्य जखमींवर इंदापूर शहरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सिव्हील इंजिनिअर अझहर यास नुकताच पुणे येथील कंपनीत जॉब लागला होता. तीन दिवसांत तो कामावर हजर होणार होता. मात्र काळाने त्याच्यावर अचानक घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारूने मृत्यूआधी दृष्टी अधू झाली, तोंडाला फेस आला; आतापर्यंत २१ मृत्यू, २२ अधिकाऱ्यांचे निलंबन

Ebola Virus: इबोला व्हायरसचा उद्रेक! ९०० हून अधिक जणांना संसर्ग, २२३ रुग्णांचा मृत्यू; नवीन स्ट्रेन किती धोकादायक?

Mumbai: ब्रेकऐवजी एक्सिलरेटरवर पाय, कारखाली चिरडून महिलेसह चिमुकल्याचा मृत्यू; मुंबईत भीषण अपघात

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

IPL 2026 : शतक केलं, GT ला फायनलमध्येही नेलं अन् मग शुभमन गिलनं आई-वडिलांना मैदानातच मारली कडकडून मिठी; Video Viral

SCROLL FOR NEXT