Rohidas Pabale Sakal
पुणे

भावकीच्या भांडणातून तरुणाचा खून: सात जणांवर गुन्हा दाखल

भावकीच्या जुन्या भांडणातून कावळ पिंपरी (ता. जुन्नर) येथील रोहिदास बाबुराव पाबळे (वय ३९) या तरुणाचा कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे खून केला.

रवींद्र पाटे

भावकीच्या जुन्या भांडणातून कावळ पिंपरी (ता. जुन्नर) येथील रोहिदास बाबुराव पाबळे (वय ३९) या तरुणाचा कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे खून केला.

नारायणगाव - भावकीच्या जुन्या भांडणातून (Fifgting) कावळ पिंपरी (ता. जुन्नर) येथील रोहिदास बाबुराव पाबळे ( वय ३९ ) या तरुणाचा (Youth) कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला (Attack) करून निर्घृणपणे खून (Murder) केल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी (Police) सात जणांवर खुनाचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.आशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी दिलीप रामा आटोळे (राहणार जांबुत ,तालुका शिरूर), सागर बंडू पाबळे( राहणार कावळ पिंपरी ,तालुका जुन्नर) , दत्ता भाकरे व त्याचे इतर चार साथीदार यांच्यावर संगनमताने खुन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

या बाबत ताटे म्हणाले मयत रोहिदास पाबळे व सागर पाबळे, दिलीप आटोळे यांच्यात वाद होता. या वरून सागर पाबळे, दिलीप आटोळे यांच्या सांगण्यावरून दत्ता भाकरे व त्याच्या चार साथीदारांनी ९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रोहिदास पाबळे यांच्यावर कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे खून केला. त्या नंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी वनीता रोहिदास पाबळे( वय २९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात सदर आरोपींनी संगनमत करून रोहिदास पाबळे याचा कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृणपणे खून केल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना घटनास्थळी काडतूस आढळून आले आहे. या वरून फायरिंग झाल्याचा अंदाज आहे.आरोपींना लवकरच अटक केली जाईल. आशी माहिती ताटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa ACB Raid Excise Checkposts : महाराष्ट्र-गोवा सीमा तपासणी नाक्यांवर एसीबीची धडक कारवाई; चेकपोस्टवर सापडली बेकायदा रोकड, 10 कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात

Microsoft Layoffs: अमेरिकेतील 'या' कंपनीने १०१ वर्षांत एकालाही नोकरीवरून काढले नाही! सीईओने काय दिले कारण?

Crime News: १५ वर्षांच्या शाळकरी मुलीची प्रसूती, लग्नाचे आमिष दाखवून ३० वर्षांच्या तरुणाने केले अत्याचार

Marathi News Live Updates : मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह घेतले सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन, मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन होत अर्पण केली प्रार्थना

Uttar Pradesh News: दिवाळीपूर्वी योगी सरकारकडून किमान वेतनाचे नवे दर जाहीर; १ ऑक्टोबरपासून सुधारित वेतन लागू

SCROLL FOR NEXT