पुणे

आसू - जागतिक महिला दिनानिमित्त फलटणमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे भव्य ‘काव्य संमेलन’

CD

महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे
फलटणमध्ये काव्यसंमेलन

मसाप शाखेकडे नावनोंदणीचे आवाहन

आसू, ता. ५ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता. ८) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेच्या वतीने तालुक्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी ‘काव्य संमेलना’चे आयोजन केले आहे.
तालुक्यातील तरुण कवयित्रींना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील काव्यप्रतिभेला वाव मिळावा, या हेतूने हे काव्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी शाखा कोषाध्यक्ष अलका बेडकीहाळ, शाखा कार्यवाह अमर शेंडे, रोहित वाकडे यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी. तालुक्यातील जास्तीतजास्त विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या उपक्रमात सहभागी विद्यार्थिनींतून ज्या कवयित्री उत्तम काव्य सादरीकरण करतील, त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य व्यासपीठावर आणि पुढील साहित्यिक उपक्रमांत काव्यरचना सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. दर्जेदार काव्य करणाऱ्या तरुणींना योग्य दिशा व व्यासपीठ मिळवून देण्यासाठी परिषद कटिबद्ध असल्याचे शाखेचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी स्पष्ट केले. फलटण तालुक्यातील महाविद्यालयांनी विद्यार्थिनींना या साहित्यिक चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही बेडकीहाळ यांनी केले आहे.

........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग, भाजप उमेदवार विधानभवनात; शरद पवार, पार्थ पवार अर्ज दाखल करणार

Nagpur Video Viral : संतापजनक! होळी खेळताना अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने चार वर्षांच्या नातवावर ओतलं उकळतं पाणी, कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगलुरु महामार्गावर नवीन कात्र बोगद्याजवळील दरी पुलाजवळ कंटनेर आणि चार वाहनांचा भीषण अपघात

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT