पुणे

पिंपोडे बुद्रुक सापडलेले पैसे परत

CD

सापडलेले ४० हजार रुपये
युवकाने केले परत

वाघोलीतील विशाल भोईटेचा प्रामाणिकपणा; परिसरातून कौतुक

पिंपोडे बुद्रुक, ता. ९ : आजच्या काळात जिथे माणूस केवळ स्वतःच्या फायद्याचा विचार करतो, तिथे माणुसकी आणि प्रामाणिकपणा अद्याप जिवंत असल्याचे उदाहरण वाघोली (ता. कोरेगाव) येथे समोर आले आहे. गावातील विशाल शिवाजीराव भोईटे या युवकाने रस्त्यात सापडलेली ४० हजार रुपयांची रोख रक्कम संबंधित व्यक्तीला सुपूर्द केली. कोणताही लोभ न धरता मूळ मालकाला पैसे परत केल्यामुळे विशालचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की माजी सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव भोईटे यांचा मुलगा विशाल सकाळी नऊच्या सुमारास भाच्याला शाळेत सोडण्यासाठी गेला होता. दुचाकीवरून माघारी परतत असताना त्याला रस्त्यावर ५०० रुपयांच्या नोटांचा बंडल पडल्याचे दिसले. ते पैसे घेऊन तो घरी आला. थोड्याच वेळात गावातील मेडिकल स्टोअर्समध्ये अनपटवाडीतील ओंकार नंदकुमार बोबडे या तरुणाचे पैसे पडल्याची माहिती त्याला समजली. विशालने क्षणाचाही विलंब न करता पैसे सापडल्याचे ग्रामस्थ व मित्रांना सांगितले. वडील शिवाजीराव भोईटे यांनी ही माहिती वाठार स्टेशन पोलिसांना कळवली. सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी विशालच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आणि पोलिसांच्या साक्षीने ४० हजार रुपये मूळ मालक ओंकार बोबडे याच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कष्टाची कमाई हरवल्यामुळे ओंकार हवालदिल झाला होता. जेव्हा हे पैसे परत मिळाले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. प्रामाणिकपणाबद्दल पोलिस व ग्रामस्थांच्या वतीने विशालचा सत्कार करण्यात आला. या वेळी पंकज भोईटे, सुधीर भोईटे, विकास भोईटे उपस्थित होते.

फोटो
01629
वाठार स्टेशन ः रस्त्यात सापडलेले पैसे परत दिल्यामुळे विशाल भोईटे याचा सत्कार करताना ओंकार बोबडे, समवेत सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF exam controversy ८५ प्रश्न कॉपी पेस्ट! SRPF भरतीला स्थगिती, पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश

DC vs CSK Live: चेन्नईच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, पण एक झेल सोडणे पडले महागात! त्रिस्तान स्तब्स-समीर रिझवीने झोडले...

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Latest Marathi News Live Update : अजित डोवाल यांनी व्हिएतनामचे सरचिटणीस आणि राष्ट्रपती 'तो लाम' यांची घेतली भेट

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

SCROLL FOR NEXT