भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत sakal
पुणे

खाजगीकरणाविरोधात युवक क्रांती व्हावी - राकेश टिकैत

भारतीय छात्र संसदच्या आठव्या सत्रात, भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांचे आवाहन

मिनाक्षी गुरव

पुणे :‘‘सरकारने रोटीला तिजोरीत बंद केले आहे. त्याच्या विरोधात देशातील सर्व शेतकऱ्यांची लढाई सुरू आहे. सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा शेवट काय होईल, हे सांगता येणार नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन हे खाजगीकरण्याच्या विरोधात आहे.  त्यासाठी देशातील युवकांनी सरकारच्या विरोधात क्रांती करावी,’’ असे आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी केले.

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या वतीने आयोजित ऑनलाइन ‘भारतीय छात्र संसद’च्या आठव्या सत्रात ‘कृषी विधेयकाला विरोध का?’ विषयावर टिकैत बोलत होते. यावेळी ‘एमआयटी’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, आसाम विधानसभेचे उपसभापती डॉ. नमुल मोमीन, भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष डॉ. कृष्णा बीर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

टिकैत म्हणाले,‘‘सरकारने देशातील सर्व संस्थांना ताब्यात घेतले असून हे असंविधानिक आहे. त्या संदर्भात युवकांना जागृत होणे गरजेचे आहे. सरकारने देशातील सर्व सरकारी संपत्ती विक्रीस काढल्या आहेत. ब्राझीलमध्ये शेतकऱ्यांची जमीन ही कंपन्याच्या हातात आहे. तशीच स्थिती या देशात यायला वेळ लागणार नाही. हे वाचविण्यासाठी जमीन वाचवावी लागेल.’’

देशात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने तीन कायदे आणले असून ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य डॉ. कृष्णा बीर चौधरी यांनी केले. तर डॉ. मोमीन म्हणाले,‘‘देशाच्या विकासासाठी व आर्थिक वृद्धिसाठी शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. देशात शेतकऱ्यांच्या नावाने आंदोलन सुरू करून राजकारण करू नका.’’ यावेळी डॉ. पौर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT