Murder sakal
पुणे

Pune Crime : अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने वार करून तरुणाचा खून

दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करून तरुणाचा भररस्त्यात खून केल्याची धक्कादायक घटना बोपोडीत घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार करून तरुणाचा भररस्त्यात खून केल्याची धक्कादायक घटना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर चव्हाण वस्तीत घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

धीरज प्रदीप भोसले (वय-२७, रा. बाराथे वस्ती, खडकी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रियांशू भोसले यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हा वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. तो मंगळवारी दुपारी रस्त्याच्या कडेला बसला होता. त्यावेळी जुन्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी धीरजच्या डोक्यात, तोंडावर कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या धीरजचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान, मागील महिन्यात आंबेडकर चौकात खडकी बाजारातील एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. या परिसरात अवैध व्यवसाय सुरू असून, या परिसरातील गुंडांकडून व्यावसायिकांना त्रास होत असल्याची तक्रार आहे. या भागातील अवैध व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT