पुणे

नवमतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा - सुनील गाढे

CD

Media Id: RHF26B11488
राहुरी : महाविद्यालयात मतदार नोंदणी मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे.

लोकशाही व्यवस्थेत युवकांचा
सहभाग महत्त्वाचा ः गाढे
राहुरी, ता. ६ : लोकशाही व्यवस्थेत युवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. एक ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र युवक-युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी. नवोदित मतदारांची नोंदणी प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी केले.

येथील लोकनेते रामदास धुमाळ पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित मतदार नोंदणी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी निवडणूक नायब तहसीलदार विशाल सदनापूर, अनिल बडे, प्राध्यापक अनिरुद्ध जाधव, महसूल कर्मचारी अनिल टेमक, अभिजित गायकवाड उपस्थित होते.

यावेळी मतदार नोंदणीची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरण्याची प्रक्रिया, मतदार यादीतील नावाची पडताळणी आणि नोंदणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
गाढे म्हणाले, “काही वर्षांपूर्वी आपणही याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होतो. आज याच महाविद्यालयात अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणे हा विशेष अनुभव आहे. मतदार नोंदणी ही लोकशाहीतील सहभागाची पहिली पायरी असल्याने नवोदित मतदारांनी स्वतःहून पुढे यावे."
प्राचार्य डॉ. नवनाथ दळवी यांनी आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहे. मतदार यादीत नाव नोंदविणे ही लोकशाहीतील सहभागाची पहिली पायरी असल्याचे सांगितले. या वेळी पात्र विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात नमुना क्रमांक सहा भरून घेण्यात आला. त्यामुळे नवोदित मतदार नोंदणीचा औपचारिक प्रारंभ झाला.
तहसीलदार डॉ. अमित पवार यांनी पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी वेळेत पूर्ण करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी आणि निवडणूक यंत्रणेने समन्वयाने काम करावे. विद्यार्थ्यांनी कुटुंबातील व परिसरातील पात्र नागरिकांनाही मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT