hand.jpg 
पुणे

ह्रदयद्रावक! पुण्यात उपासमारीमुळे 'त्या' कुटुंबावर जीवन संपविण्याची वेळ अन् उचलले हे पाऊल

कृष्णकांत कोबल

मांजरी (पुणे) : केवळ पूजा-पाठावर सुरू असलेला चरितार्थ कोरोनामुळे बंद झाला. कुटुंबातील इतर कोणीही कमावते नाही. बंद पडलेल्या बॅंकेत अडकलेली पुंजी. शारीरिक व्याधी असल्याने दुसरे काही करू शकत नाही. त्यामुळे फुरसुंगी भेकराईनगर येथील एका ब्राह्मण कुटुंबावर वेळ आली आहे. निराशेच्या गर्तेत जाऊन जीवन संपविण्याच्या विचारात असलेल्या या कुटुंबाला युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देऊन सावरले आहे. 

गेली तीस वर्षापासून दीपक तांबोळी हे पूजा-पाठ व शुभकार्य करीत आहेत. सायकलवरून उदबत्ती विकण्याचेही काम ते करीत होते. यातून पत्नी व मुलीसह ते आपला चरितार्थ चालवीत आहेत. मात्र, कोरोना व लॉकडाऊनमुळे त्यांचा हा रोजगार बंद झाला आहे. जी काही पुंजी होती तीही संपलेली आहे. मधुमेह, रक्तदाब, मान व मणक्‍याचे आजार त्यामुळे दुसरे काम होत नाही. या परिस्थितीत या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 

तांबोळी यांनी एक पत्र लिहून त्यात आपली परिस्थिती मांडली आहे. त्यात त्यांनी धान्याच्या स्वरूपातील मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलिसांनीही त्यांना काही वेळा जेवण पुरविले आहे. मदत मिळणार नसल्यास जीवन संपविण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

हे पत्र त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने व्हाट्‌सऍपवर व्हायरल केले होते. क्रीडा पुरस्कार विजेते रूपेश मोरे यांनी हे पत्र युवासेनेचे शादाब मुलाणी यांना दाखवले. दरम्यान मुलाणी यांच्यासह कार्यकर्ते नीलेश पवार, लता ढमाळ, मयूर शिंदे, पंकज भारती यांनी तांबोळी यांच्या घरी जाऊन तीन महिने पुरेल इतका किराणा, धान्य, औषधे व गॅस भरून दिला आहे. खर्चासाठी दिले जात असलेले पैसे मात्र त्यांनी नाकारले. युवासेनेने केलेल्या मदतीमुळे या कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

SCROLL FOR NEXT