पुणे

विद्यापीठात रंगणार युवास्पंदन महोत्सव 

सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठामध्ये येत्या १९ ते २३ डिसेंबर दरम्यान ‘युवास्पंदन - आंतरविद्यापीठीय पश्‍चिम विभाग युवक महोत्सव २०१८’ आयोजित केला आहे. 

विद्यापीठाला यंदा पहिल्यांदाच या महोत्सवाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते बुधवारी या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक आणि महोत्सवाचे संयोजक सचिव डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते.

‘‘महाराष्ट्र, गोवा, गुजरात व राजस्थान या चार राज्यांमधील विद्यापीठांमधून दोन हजार विद्यार्थी कलावंत या महोत्सवामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, ललित कला व साहित्य या प्रकारांमधील कला सादर करणार आहेत,’’ असे डॉ. करमळकर यांनी सांगितले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांची सांस्कृतिक अभिरुची समृद्ध होण्यामध्ये हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास प्र- कुलगुरू डॉ. उमराणी यांनी या निमित्ताने व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती! सोलापूरच्या ‘आयटी पार्क’ची जागा कृष्णा खोरे नियामक मंडळाच्या ३० वर्षांच्या धोरणात अडकली; अभियंत्यांच्या निशिबी प्रतीक्षा

आजचे राशिभविष्य - 09 जून 2026

तिखट-चटपटीत मसाले आणि वितळलेलं चीज; हा 'बेल पेपर टोस्ट' सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठरतो परफेक्ट स्नॅक

India Aaghadi: इंडिया आघाडीचं ठरलं! भाजपविरोधात 'हा' प्लॅन रेडी; उद्धव ठाकरेंचा मात्र वेगळाच सूर, भर बैठकीत सुनावलं...

Donald Trump: ''तात्काळ हल्ले थांबवा, नाहीतर...'', डोनाल्ड ट्रम्प यांचा इराण-इस्रायलला इशारा; पुढच्या दोन दिवसात सगळं थांबणार?

SCROLL FOR NEXT