पुणे

व्यवसायात जोखीम स्वीकारण्याची तरुणांची तयारी हवी

CD

फोटो ओळ :
पंढरपूर : येथे ‘युवा’च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात युटोपियन शुगर्सचे संचालक उमेश परिचारक यांचा सन्मान करताना मान्यवर.

व्यवसायात जोखीम स्वीकारण्याची तरुणांची तयारी हवी
अनिरुद्ध देशपांडे : उमेश परिचारक यांना पुरस्कार प्रदान; गश्मीर महाजनी यांचाही सन्मान

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. ८ : ब्राह्मण समाजात नोकरी देणाऱ्या उद्योजकांची संख्या वाढत असून, अनेक तरुण काही वर्षे नोकरी केल्यानंतर व्यवसायाकडे वळत आहेत. व्यवसायवाढीसाठी नेटवर्किंग महत्त्वाचे आहे. मात्र, नेटवर्किंग म्हणजे केवळ व्हिजिटिंग कार्डची देवाणघेवाण नव्हे, तर परस्परांशी नातेसंबंध निर्माण करणे होय. त्यातून व्यवसायाला चालना मिळते. तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) अतिअवलंबून न राहता जोखीम स्वीकारून व्यवसाय करावा, असे मत सिटी कॉर्पोरेशन लि.चे अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रगतशील बागायतदार व युटोपियन शुगर्स लि.चे संचालक उमेश परिचारक यांना स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रीत्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार, तर अभिनेता गश्मीर महाजनी यांना सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गश्मीर महाजनी म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अपयश स्वीकारण्याची तयारी असावी लागते. सुरुवातीलाच दहा-पंधरा टक्के अपयशाने घाबरणारा उद्योजक होऊ शकत नाही. पुरस्कार देण्यामागील भावना प्रिया प्रभुदेसाई यांनी मांडली. सृजन आर्ट गॅलरीचे चारुहास पंडित यांनीही भूमिका स्पष्ट केली. विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर श्रीकांत जोशी यांनी युवा उपक्रमाची माहिती दिली. यावेळी आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या समीर व अनुराधा पळनीटकर या भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत पाच हजारांहून अधिक किलोमीटरचा सायकल प्रवास केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, डॉ. चैतन्य सराफ, विवेक मेढेकर, अजय कुलकर्णी, प्रतिभा संगमनेरकर, अपूर्वा देवगावकर, मंजुषा वैद्य, हर्षल लेले, उपेंद्र केळकर, सचिन पंडित आदी उपस्थित होते. मंदार महाजन यांनी सूत्रसंचालन केले. विवेक मेढेकर यांनी आभार मानले.

चौकट...
भविष्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय : परिचारक
उमेश परिचारक म्हणाले, देशाची लोकसंख्या १४० कोटींवर पोहोचली असली, तरी त्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र वाढलेले नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनचा वापर करून शेती करण्याशिवाय पर्याय नाही. शेती हा अशिक्षितांचा नव्हे, तर सुशिक्षितांचा व्यवसाय आहे. भविष्यातही शेती हाच प्रमुख व्यवसाय राहणार असून, देशाची भूक शेतकरीच भागवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Diwali Celebration: सिंहगडावर दिवाळी पहाटेचा अनोखा दीपोत्सव! कल्याण दरवाजात मशालींची रोषणाई, तानाजी मालुसरेंच्या समाधीवर दीपज्योती

Rajasthan Voter List Discrepancy : 30 लाख मतदारांची नावे गहाळ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात, SIR प्रक्रियेनंतर दोन याद्यांमध्ये तफावत

U19 IND vs U19 PAK: एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले अन् तिघांकडून भारतीय फलंदाजाचा कॅच सुटला! पाहा Comedy Fielding ड्रामा

Latest Marathi News Live Update: : "आमदारांचे वेतन बंद करा, पण दिव्यांगांचे मानधन ५ ते १० हजारांपर्यंत वाढवा"; अमरावतीच्या कार्यक्रमात आमदार रवी राणांची आक्रमक मागणी

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

SCROLL FOR NEXT